‘सेकंडहोम’साठी नाशिकला प्राधान्य ; ना. डॉ. भारती पवार, प्रॉपर्टी एक्स्पोचे उद्घाटन | पुढारी

‘सेकंडहोम’साठी नाशिकला प्राधान्य ; ना. डॉ. भारती पवार, प्रॉपर्टी एक्स्पोचे उद्घाटन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिकच्या बांधकाम क्षेत्राला मोठा वाव आहे. मोठी-मोठे प्रकल्प उभे राहत आहेत. मुंबई उपनगरे, उत्तर महाराष्ट्र, गुजरात येथूनही नाशिकमध्ये सेकंडहोम किंवा गुंतवणूक होत आहे. भविष्याचा विचार करता नाशिकमध्ये घर खरेदी करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले.

क्रेडाई नाशिकच्या वतीने आयोजित प्रॉपर्टी एक्स्पोचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले, यावेळी झालेल्या कार्यक्रमात त्या मार्गदर्शन करीत होत्या. व्यासपीठावर आमदार सीमा हिरे, क्रेडाईचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अनंत राजेगावकर, महाराष्ट्रचे सुनील कोतवाल, क्रेडाई नाशिकचे अध्यक्ष रवि महाजन, स्टेट बँकेचे महाव्यवस्थापक राजेंद्र कुमार, माजी अध्यक्ष सुरेश पाटील, उमेश वानखेडे, सेक्रेटरी गौरव ठक्कर, प्रदर्शनाचे समन्वयक अनिल आहेर, सचिन बागड आदी होते.

कोविड काळात भारताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात देशातच लस निर्माण केली, ज्यामुळे आज 185 कोटी डोस देण्यात यश मिळाले असून, हा जागतिक विक्रम आहे. याचबरोबर कोविन अ‍ॅप अनेक देशांनी स्वीकारला असून, आज अनेक प्रगत देश पुन्हा निर्बंध, लॉकडाऊन लावत असताना भारतात मात्र तशी परिस्थिती दिसून येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारच्या बांधकाम कामगारांसाठी अनेक योजना असून, त्यांचा लाभ त्यांना मिळावा याकरिता क्रेडाईने प्रयत्न केले पाहिजे, हा लाभ त्यांना मिळाला पाहिजे याकरिता काम करावे, असे आवाहन पवार यांनी केले. रवि महाजन यांनी शहर वेगाने विकसित होत आहे. शहरानजीक विमानतळ आहे. मात्र, येथून दिल्ली, बंगळुरू, गोवा विमानसेवा सुरू व्हावी. ही सेवा सुरू झाल्यास शहराची कनेक्टिव्हिटी वाढण्यास मदत होईल त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा व्हावा. तसेच ग्लोबल मेडिको सिटी बनविण्याच्या दृष्टीने अत्याधुनिक आरोग्यसेवा असलेल्या रुग्णालयासाठी प्रयत्न व्हावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. यावेळी आमदार हिरे, अनंत राजेगावकर यांनीदेखील मार्गदर्शन केले.

हेही वाचा :

Back to top button