लंडन : विक्रमासाठी कोण काय करील हे काही सांगता येत नाही. आतापर्यंत जगभरात अनेक भन्नाट विश्वविक्रम नोंदवलेले आहेत. पोलंडमधील एका माणसानेही असाच एक अनोखा विक्रम केला आहे. त्याने जगातील सर्वात उंच सायकल (Tall bicycle) बनवली आहे आणि ती त्याने चालवूनही दाखवलेली आहे. गिनिज बुकमध्ये या सायकलीची नोंद झाली आहे.
या सायकलची उंची 24 फूट 3.73 इंच म्हणजेच 7.41 मीटर आहे. अॅडम डॅनोविक्ज नावाच्या माणसाने ही सायकल (Tall bicycle) बनवली आहे. तो ही सायकल चालवत असतानाचा एक व्हिडीओ गिनिज बुकने इन्स्टाग्रामवर पोस्टही केलेला आहे. त्यामध्ये गिनिज वर्ल्ड रेकॉर्डस्ने कॅप्शन दिली आहे की 'सर्वात उंच आणि चालवता येण्यासारखी सायकल'.
ही सायकल (Tall bicycle) अॅडम डॅनोविक्ज याने बनवली असल्याचेही त्यामध्ये म्हटले आहे. अॅडमने म्हटले आहे की ही त्याने डिझाईन केलेली त्याची आजपर्यंतची सर्वात मोठी सायकल आहे. याचा अर्थ यापूर्वीही त्याने अनेक सायकली बनवलेल्या आहेत. 'एक उत्तम साहसी राईड' असेही त्याने या सायकलीचे वर्णन केले आहे. ही सायकल बनवण्यासाठी त्याला एक महिना लागला. त्यासाठी त्याने केवळ जुन्या साहित्याचाच वापर केला हे विशेष! एखाद्या मनोर्यासारखी ही सायकल तो लिलया चालवून दाखवतो.
हेही वाचा :