स्पोर्ट्स

पी. व्ही. सिंधू क्रिकेटपटूंना मागे टाकेल इतकी करते कमाई

backup backup

टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणारी पी. व्ही. सिंधू सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. त्यातच तिने रियो आणि टोकियो अशा दोन पाठोपाठच्या ऑलिम्पिकमध्ये पदकाची कमाई करुन विक्रम रचला. सिंधू ज्या प्रकारे पदकांच्या कमाईत आघाडीवर आहे. त्याच प्रमाणे ती तिच्या वैयक्तिक कमाईतही अग्रेसर आहे.

पी. व्ही. सिंधू ही भारतातीलच नाही तर जागतिक स्तरावरील अव्वल बॅडमिंटनपटू आहे. पण, भारतात क्रिकेटपटूंची जेवढी ब्रँड व्हॅल्यू आहे त्या तुलनेत इतर खेळातील स्टार खेळाडूंची नाही. मात्र याला सिंधू अपवाद ठरते. त्यातच आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकल्याने त्यात अजूनच भर पडली आहे.

पी. व्ही. सिंधूची २०१२ मधील निव्वळ संपत्ती

गेल्या वर्षीपर्यंत पी. व्ही. सिंधूची निव्वळ संपत्ती ही ७२ कोटी इतकी होती. २०१८ आणि २०१९ ला प्रसिद्ध फोर्ब्सने सिंधूला जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंच्या यादीत स्थान दिले होते. फोर्ब्सच्या मते २०१८ मध्ये पी. व्ही. सिंधू ६० कोटी कमवत होती. पण, २०१९ मध्ये यात घट होऊन तिची निव्वळ संपत्ती ४० कोटी झाली. आजच्या घडीला सिंधूची निव्वळ संपत्ती ७२ कोटीच्या घरात गेली आहे.

सिंधूचे मोठे टायअप

पी. व्ही. सिंधू हे भारतीय क्रीडा जगतातील एक मोठं नाव आहे. त्यामुळे अनेक बड्या कंपन्या तिच्याशी टायअप करण्यासाठी उत्सुक असतात. २०१९ मध्ये चीनच्या लि निंग या ब्रँडने तिच्याबरोबर चार वर्षाचा करार केला. हा करार ५० कोटींचा आहे. हा करार बॅडमिंटनमधील सर्वात मोठ्या वैयक्तिक करारामधील एक आहे.

यातील ४० कोटी रुपये स्पॉन्सरशिप म्हणून दिली जाणार होती. तर उरलेल्या रक्कमेतून उपकरणे खरेदी करता येणार होती. यापूर्वी २०१६ ते २०१८ पर्यंत सिंधूला योनेक्सची ३५ कोटी रुपयांची स्पॉन्सरशिप होती. आता तर सिंधूने कांस्य पदक जिंकले असल्याने तिच्या कराराची रक्कम वाढण्याची शक्यता आहे.

सिंधू करते मोठ्या ब्रँडची जाहिरात

सध्या पी. व्ही. सिंधू जवळपास १३ मोठ्या ब्रँडचे प्रमोशन करते. यात जेबीएल, ब्रिजस्टोन टायर, बँक ऑफ बडोदा, गॅटोरेड, मूव्ह, मिंत्रा, फ्लिपकार्ट, नोकिया, पॅनासॉनिक, स्टेफ्री यासारख्या मोठ्या ब्रँडचा समावेश आहे.

२०१७ मध्ये एका मोठ्या वर्तमानपत्राने दिलेल्या माहितीनुसार सिंधूची ब्रँडमधून होणारी कमाई विराट कोहलीपेक्षा थोडीच मागे आहे. पी. व्ही. सिंधू प्रत्येक जाहिरातीसाठी १ ते १.५ कोटी रुपये घेते. आता या रक्कमेत वाढ झाली असणार आहे. याचा अर्थ सिंधू काही स्टार क्रिकेट खेळाडूंपेक्षाही अधिक रक्कम प्रती जाहिरात कमवत असेल.

पी. व्ही सिंधूची वार्षिक कमाई

एका आघाडीच्या वेबसाईटनुसार ( paycheck.in ) सिंधूची आठवड्याची कमाई ही १ कोटीपेक्षा थोडीशीच कमी आहे. सिंधू वर्षाला करोडो रुपये कमवते. टीम इंडियामधील काही क्रिकेट खेळाडूंशी तुलना करता ही रक्कम बरीच मोठी आहे. काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तिची वर्षाची कमाई ही ४१ कोटी रुपये इतकी आहे.

याचा अर्थ स्टार सिंधू महिन्याला जवळपास ३ कोटी रुपये कमवते. भारतातील अनेक खेळाडू वर्षालाही इतके कमवत नाहीत. आता तर सिंधूने सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्याने तिची ब्रँड व्हॅल्यू अजूनच वाढणार आहे. त्यामुळे तिच्या निव्वळ संपत्तीत अजून वाढ होणार हे नक्की.

हेही वाचले का? 


पाहा व्हिडिओ : महाराष्ट्राचे सर्वात मोठे ऑनलाईन शिक्षण प्रदर्शन आणि वेबिनार मालिका

https://youtu.be/86gQicR7sfM

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT