मनोरंजन

स्वप्नील बांदोडकर याचे ‘हे आराध्य’ गीत येणार रसिकांच्या भेटीला

स्वालिया न. शिकलगार

मुंबई; पुढारी ऑनलाईन : युवा संगीतकार अक्षय दाभाडकर यांनी संगीतबद्ध केलेले 'हे आराध्य' गीत भेटीला येणार आहे. गायक स्वप्नील बांदोडकर याच्या आवाजात हे गीत स्वरबद्ध केले आहे. स्वप्नील बांदोडकर याच्या सुरेल आवाजातील हे गाणे लवकरचं तुम्हाला ऐकायला मिळणार आहे.

डॉ. प्रदीप कार्यकर्ते यांनी हे गीत लिहिले आहे "हे आराध्य सकल जनांच्या" "विघ्नविनाशक मोरया" असे गाण्याचे बोल आहेत, अशी माहिती शरद दाभाडकर आणि सुधीर दाभाडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गणरायाला स्मरून मी हे गीत गायलं आहे. युवा संगीतकार अक्षय सोबत काम करताना छान अनुभव होता, असे स्वप्नील बांदोडकरने सांगितले.

गणेशोत्सवानिमित्ताचे औचित्य साधून गणेश भक्तांसाठी सदरील गीत तयार केले आहे. अक्षयला लहानपणापासून संगीताची आवड आहे. सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक पंडित रमाकांत यांच्याकडे त्याने संगीताचे धडे घेतले आहेत.

"हे आराध्या" या विघ्नहर्त्या गणपतीवर युवा वर्गाला आवडेल. तसेच सर्वच प्रेक्षकांना आवडेल असे गाणे आहे. ढोल ताशाच्या गजरात रचना तयार केली आहे. जी रसिकांच्या मनाचा ठाव घेईल.

अक्षय दाभाडकर म्हणाला की, आगामी काळात मी गजल, भावगीत आणि चित्रपटांना ही संगीत देणार आहे.

हेदेखील वाचलं का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT