पुणे, पुढारी ऑनलाईन: खासदार संजय राऊत #sanjay raut हे शिवसेनेसाठी नाही, तर राष्ट्रवादीसाठी काम करत आहेत, अशी घनाघाती टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.
संजय राऊत २०१४ पासून सातत्याने भाजपासोबत सरकार होऊ नये, यासाठी काम करत आहेत.
२०१४ मध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांची एकूण संख्या १४४ पर्यंत पोहोचू शकली नाही. त्यामुळे संजय राऊत यांना त्यावेळी काही करता आले नाही.
मात्र २०१९ मध्ये तिघांची एकूण संख्या १४४ होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सरकार बनवले. दुर्दैवाने उद्धवजींना हे लक्षात येत नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
संजय राऊत #sanjay raut हे शिवसेनेसाठी नाही, तर शरद पवार यांच्यासाठी काम करत आहेत, असा गंभीर आराोप चंद्रकांत पाटील यांनी केला.
त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत होत आहे,
काँग्रेस लयास गेली आहे. तर शिवसेना कमकुवत बनत चालली आहे, असेही ते म्हणाले.
'शिवसेना सध्या कळसूत्री बाहुले बनले आहे. कोणीतरी दिलेल्या स्क्रीप्टनुसार संघटना काम करत आहे.
त्यामुळे आम्हीदेखील तुमच्या स्क्रीप्टनुसार काम करू का? आम्ही आमचं काम करत राहू. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे कॅबिनेट मंत्री आहेत.
पण त्यांच्या जर-तरच्या वाक्यावरुन अटक होते. त्यापेक्षा संजय राऊत यांचे कोथळा काढू हे वाक्य भयंकर आहे.
त्यावर मी फक्त एवढंच म्हटलं की, 'कोथळा काढायसाठी हातात जे शस्त्र घ्यावं लागतं, ते घेण्यासाठी तुमच्या दंडात तेवढी ताकद आहे का बघा?'
२०१९ मध्ये महापूर आल्यानंतर पंचनामे न करताही आम्ही तत्काळ मदत केली होती.
आता जर पूरग्रस्तांचे पंचनामे होऊनही मदत मिळत नसेल तर आक्रमक का होऊ नये? असे पाटील यांनी राजू शेट्टी यांच्या आंदोलनाचे समर्थन केले.
पाटील म्हणाले, शरद पवार यांनी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले.
शरद पवारांनी पाठीत खंजीर खुपसल्यावर शालेय पाठ्यपुस्तकात धडाच येण्याचं बाकी आहे.
कारण वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर कोणी खुपसला, हे संपूर्ण राज्याला माहिती आहे.'
हेही वाचा: