मुंबई; पुढारी ऑनलाईन : सोनम कपूर हिच्या हस्ते राकेश मेहरा यांच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण करण्यात आले. सोनम कपूर हिने तिच्या सोशल मीडिया हँडलवर 'द स्ट्रेंजर इन द मिरर' या पुस्तकाचं अनावरण केलं.
अधिक वाचा –
राकेश ओमप्रकाश मेहरा हे मागील काही वर्षांपासून बॉलिवूडच्या अनेक उत्तम कालाकृतींसोबत जोडले गेले आहेत. इंडस्ट्रीला 'रंग दे बसंती', 'दिल्ली 6', आणि 'भाग मिल्खा भाग' सारख्या अनेक उत्तम चित्रपट त्यांनी दिले. आता आपले आत्मचरित्र, द स्ट्रेंजर इन द मिररच्या अनावरणासाठी ते सज्ज झाले आहेत.
अधिक वाचा –
आत्मचरित्राची 'फाॅरवर्ड' ए. आर. रहमान यांनी लिहिले आहे. रहमान यांनी मेहरा यांच्यासोबत 'रंग दे बसंती' आणि 'दिल्ली 6' सारखे दोन चित्रपट केले आहेत. पुस्तकासाठी 'आफ्टरवर्ड' आमिर खानने लिहिले आहे.
सोनम आणि राकेश समीक्षकांद्वारे गौरवलेला चित्रपट 'दिल्ली 6' आणि 'भाग मिल्खा भाग' साठी एकत्र आले होते.
अधिक वाचा –
अभिनेत्रीने आता आपल्या सोशल मीडिया हँडलवर आपल्या पूर्व-दिग्दर्शकाच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण केले, ज्याला तिने कॅप्शन दिले आहे, "FIRSTLOOK"
रीता राममूर्ति गुप्ता या पुस्तकाच्या सह-लेखिका आहेत.
यामध्ये भारतीय सिनेमा आणि जाहिरात विश्वातील काही दिग्गज नावे- वहीदा रहमान, ए आर रहमान, मनोज बाजपेयी, अभिषेक बच्चन, फरहान अख्तर, सोनम कपूर, रवीना टंडन यांचा समावेश आहे.
तसेच रोनी स्क्रूवाला, अतुल कुलकर्णी, आर. माधवन, दिव्या दत्ता आणि प्रहलाद कक्कडदेखील सामील आहेत.
अधिक वाचा –
पाहा व्हिडिओ – "हे विठु राया आता कोरोना संपू दे आणि शाळा सुरु होउदे…"