मनोरंजन

‘मुंबई डायरीज 26/11’ ट्रेलर रिलीज, आदित्य ठाकरेंची उपस्थिती (Video)

स्वालिया न. शिकलगार

मुंबई; पुढारी ऑनलाईन: ॲमेझॉन प्राईमवर 'मुंबई डायरीज 26/11' चा ट्रेलर रिलीज झाला आहे. ओरिजनल सीरिज 'मुंबई डायरीज 26/11' च्या ट्रेलरचे अनावरण झाले. गेट वे ऑफ इंडिया येथे हा कार्यक्रम पार पडला. 'साहस को सलाम' या दिमाखदार सोहळ्यात मालिकेचा ट्रेलर रिलीज झाला.

अत्यावश्यक सेवेतील कमर्मचाऱ्यांचा सन्मान करताना आदित्य ठाकरे

डॉक्टर्स, पोलिस, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या बलिदानाप्रती आदरांजली वाहण्यात आली.

पर्यावरण, शिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थिती होती.

यावेळी अमेझॉन इंडिया ओरिजिनलच्या प्रमुख अपर्णा पुरोहित, दिग्दर्शक निखिल अडवाणी उपस्थित होते. निर्माते आणि मालिकेतील कलाकार यांची सहउपस्थिती होती.

यावेळी 'साहस को सलाम' हा कार्यक्रम पार पडला. मुंबईच्या अत्यावश्यक सेवेतील नायकांच्या अमूल्य बलिदानाच्या स्मृती जागवणारा हा कायक्रम होता.

हा शो ९ सप्टेंबर २०२१ रोजी २४० पेक्षा जास्त देशात पाहायला मिळणार आहे. अॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रसारित होणार आहे.

निखिल अडवाणी याचे दिग्दर्शन आहे. एमी एंटरनेटमेंटच्या मोनिशा अडवाणी, मधू भोजवानी यांची निर्मिती आहे. निखिल गोन्सालविस यांचे सहदिग्दर्शन आहे.

२६ नोव्हेंबर २००८ रोजी हशतवादी हल्ला झाला.

परिचारिका, पॅरामेडिकल, रूग्णालय कर्मचाऱ्यांनी लोकांचे जीव वाचवले. त्यांची अप्रकाशित कथा या मुंबई डायरीज सादर करते.

त्यात या मालिकेमध्ये ज्यात कोंकणा सेन शर्मा, मोहित रैना, टिना देसाई कलाकार दिसणार आहेत.

श्रेया धन्वंतरी, सत्यजित दुबे, नताशा भारद्वाज, मृण्मयी देशपांडे, प्रकाश बेलावडी कलाकार आहेत.

दिग्दर्शक निखिल अडवाणी म्हणाले-

"मुंबई डायरीज मालिका, २६/११ च्या भयानक रात्रीविषयी एक वेगळा दृष्टीकोन देते. जो आत्तापर्यंत पडद्यावर आलेला नाही," असे दिग्दर्शक निखिल अडवाणी म्हणाले.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि नायक यांना ही श्रद्धांजली आहेच. पण ही मालिका ज्यामध्ये अष्टपैलू कलाकारांची फौज, ज्यांनी कथा जिवंत करण्यासाठी आत्मा ओतला आहे. अशी भावनिकता आणि नाट्यमयता यांचे उत्तम मिश्रण आहे.

'मुंबई डायरीज मालिका डॉक्टर, नर्सेस, इंटर्न आणि वॉर्डबॉय यांचं बलिदान व्यक्त करतं. त्यादृष्टीने त्या भयानक प्रसंगाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन देते. ही मालिका प्रेक्षकांना बॉम्बे जनरल हॉस्पिटलमधील सज्ज्याच्या भागात नेते. त्या भयंकर रात्री तिथे काय घडले याचे नाट्य उलगडते.

आदित्य ठाकरे यांची उपस्थिती

या मालिकेविषयी आम्हाला प्रचंड अभिमान आहे. पर्यावरण, पर्यटन आणि शिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.अमेझॉन प्राईम व्हिडिओमार्फत आम्ही ही कथा जगभर पोहोचवण्यात सक्षम होऊ.अशा वेळी जेव्हा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची त्यांच्या अथक परिश्रमासाठी प्रशंसा होणे गरजेचे आहे. या मालिकेसाठी यापेक्षा चांगले स्थान किंवा वेळ अपेक्षित करू शकले नसते."

हेही वाचलं का ?

पाहा व्हिडिओ- Mumbai Diaries – Official Trailer | Amazon Original 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT