Bollywood News : हाॅट श्वेता तिवारीचे बोल्ड फोटो व्हायरल
पुढारी ऑनलाईन डेस्क : हिंदी मनोरंजन विश्वात (Bollywood News) छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी आपल्या हाॅट आणि सेक्सी फोटोंनी नेहमीच चर्चेत असते. यावेळी तिने आपले बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले आहेत. तिचा सेक्सी लूक चाहत्यांना चांगलाच आवडलेला दिसत आहे.
जसं जसं श्वेताचं वय वाढत आहे, तसं तसं ती आणखीच ग्लॅमरस होत असल्याचे या फोटोंमधून दिसत आहे. तिने नुकतेच काही बोल्ड फोटोशूट केलेलं आहे. तिच्या मादक अदा फाॅलोअर्सना घायाळ करत आहेत. तिच्या फोटोंना मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि काॅमेंट्स पडताहेत.
या फोटोंमध्ये श्वेताने शिमरी गाऊन परिधान केलेला आहे. तिचे या गाऊनमधील फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत. श्वेताने परिधान केलेल्या गाऊना डीप नेक आणि साईड स्लिट आहे. या ड्रेसमध्ये श्वेता टोण्ड फिगर फ्लाॅन्ट करताना चाहत्यांना (Bollywood News) दिसत आहे.
श्वेताने या फोटोंनी विषेश कॅप्शन दिलेली आहे. ती म्हणते की, "गरज पडली तरी नियम तोड, त्यासाठी कुणाची माफीदेखील मागू नका." तिच्या या हटके कॅप्शनमुळे चाहत्यांमध्ये ती चर्चेचा विषय ठरलेली आहे.
श्वेता नेहमीच बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असली, तरी वैवाहिक आयुष्यातील घडामोडींमुळेही नेहमीच चर्चेत राहिली आहे. १९९८ मध्ये वयाचा १८ व्या वर्षी श्वेताने अभिनेता राजा चौधरीशी लग्न केलं होतं. ९ वर्षं ते एकत्र राहिले. नंतर त्यांच्या घटस्फोट झाला.
श्वेताला आणि राजा चौधरीपासून पलक नावाची मुलगी आहे. सध्या ती २० वर्षांची आहे. या नंतर तिने अभिनव कोहलीसोबत लग्न केलं. पण, तिचं हेदेखील लग्न फार काळ टिकू शकलं नाही. २०१९ मध्ये अभिनव आणि श्वेता वेगळे झाले. श्वेता तिवारी हिला अभिनवपासून झालेला रेयांस नावाचा मुलगा आहे.
या अभिनेत्रींचे बोल्ड फोटो पाहिलतेत का ?

