अमिताभ बच्चन ते तीन खानपर्यंत! बॉडीगार्ड्सचे कोटीत आहेत पगार | पुढारी

अमिताभ बच्चन ते तीन खानपर्यंत! बॉडीगार्ड्सचे कोटीत आहेत पगार

मुंबई ; पुढारी ऑनलाईन: बॉलिवूड स्टार्संना नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी चित्रपटाच्या शूटिंग आणि गर्दीच्या ठिकाणी जावे लागते. त्यामुळे त्यांची सुरक्षितता महत्वाची असते. बॉलिवूड अभिनेता आणि बिग बी अमिताभ बच्चन ते सलमान खानपर्यत सर्वांना सुरक्षिततेसाठी एका बॉडीगार्ड्सची नेमणुक करावी लागते. परंतु, आपल्याला या मोठ्या स्टार्संच्या बॉडीगार्ड्सच्या पगाराची माहिती आहे का? त्यामुळे जाणून घेवूयात त्याचा पगार किती आहे…

स्टार्संच्या बॉडीगार्ड्सना दिला जातो इतका पगार

बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या बॉडीगार्डचे नाव जितेंद्र शिंदे असून त्यांना वर्षाला १.५ कोटी रुपये पगार दिला जातो. बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान होय. आमिरच्या बॉडीगार्डचे नाव युवराज घोरपडे असून त्याला वर्षाला दोन कोटी रूपये पगार दिला जातो.

बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारच्या बॉडीगार्डचे नाव श्रेयसे ठेले असून त्याला एका वर्षाला जवळपास १.२ कोटी रूपये पगार देण्यात येतो. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा बॉडीगार्ड शेराचा ओळख सर्व चाहत्यांना माहिती आहे. सलमान शेरा हा खास बॉडीगार्ड आहे. शेराला वर्षाला ३ कोटी रुपये पगार दिला जातो.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या बॉडीगार्डचे नाव जलाल असून त्याला एका वर्षाचा ८० लाख पगार दिला जातो. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माच्या बॉडीगार्डचे नाव प्रकाश सिंह उर्फ सोनू असून त्याला एका वर्षाला १.२ कोटी पगार दिला जाते.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या बॉडीगार्डला सर्वात जास्त पगार दिला जात आहे. शाहरुखच्या बॉडीगार्डचे नाव रवि सिंह असून त्याला एका वर्षाला २.५ कोटी रूपये पगार दिला जाते.

बॉलिवूड स्टार्संना देशात आणि परदेशातही चित्रपटाच्या शुंटिगसाठी जावे लागते. काही वेळी चित्रपटाच्या सेटवर देखील चाहत्यांची गर्दी होत असते. यामुळे स्टार्संना वेळेवर ने-आण करण्याची आवश्यकता असते. या सगळ्यात स्टार्संना सुरक्षित राहता यावे यासाठी बॉडीगार्ड ठेवणे आवश्यक असते. म्हणूनच हे स्टार्स भक्कम पगार देवून बॉडीगार्ड नेमणुक करत असतात.

हेही वाचलंत का? 

Back to top button