मनोरंजन

जुई गडकरीचा दीड दिवसांचा बाप्पा; उल्हास नदी प्रदूषणमुक्तीचा दिला संदेश

स्वालिया न. शिकलगार

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : टेलिव्हिजनवरील मराठी अभिनेत्री जुई गडकरी हिनेही उल्हास नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी गणेशभक्तांसह साऱ्यांना  संदेश दिला आहे. जुई गडकरी हिच्या घरच्या दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन उल्हासन दीमध्ये करण्यात आला नाही. त्याऐवजी घराजवळच्या विहिरीत करण्यात आला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

जुई गडकरी ही मराठी टेलिव्हिजन अभिनेत्री आहे. जुई पुढचं पाऊल या मालिकेसाठी ओळखली जाते. २०१० मध्ये बाजीराव मस्तानी मधली चंदा, २०११ मध्ये माझिया प्रियाला प्रीत कळेना मधली सोनिया, तुजवीण सख्या रेत मधली लावण्या, २०१७ मध्ये पुढचं पाऊल मधली कल्याणी अशा तिच्या भूमिका आहेत.

२०१८ मध्ये सरस्वतीमधील देविकाही आपल्या लक्षात आहे.

बिग बॉस मराठी स्पर्धेतून ४९ व्या दिवशी हीच अभिनेत्री बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली.

२०१९ मध्ये वर्तुळमधली मिनाक्षी अशा तिच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या आहेत.

जुईने इन्स्टाग्रामवर तिच्या घरच्या बाप्पाच्या विसर्जनाची पोस्ट केली आहे.

तिने म्हटलंय- कोव्हीड, उल्हासनदीवर होणारी गर्दी आणि नदीच्या पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी ती विहिरीतचं गेली दोन वर्ष आम्ही आमच्या विहिरीतच बाप्पाचं विसर्जन करतोय ! बाप्पा गेला तरी आमच्याबरोबरच असतो

.१.५ दिवसाचा बाप्पा होता. comments vachun muddam hey mention kelay me, असे जुईने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

बिग बॉस फेम जुई गडकरीने उल्हास नदी वाचवा, असा संदेश दिला आहे.

उल्हास नदीच्या बाजूला असलेल्या कर्जत शहरात ती राहते.
उल्हासनदी प्रदूषण मुक्त व्हावी, असा संदेश इंस्टाग्राममध्ये केलेल्या पोस्टमधून दिला आहे.

आपल्या घरातील लाडक्या बाप्पाचे विसर्जन नदीमध्ये न करता घराजवळील कुंडामध्ये विसर्जन केले.

तसेच उल्हास नदी बचाव असा संदेश दिला आहे.

जुई गडकरीला मराठी मालिका पुढचं पाऊल आणि मराठी बिग बॉसमध्ये साऱ्या रसिक प्रेक्षकांनी पाहिले आहे.

हेही वाचलं का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT