मनोरंजन

अजय देवगण याचा भूज ओटीटीवर होणार प्रदर्शित

स्वालिया न. शिकलगार

मुंबई; पुढारी ऑनलाईन : अजय देवगण याचा भूज – द प्राईड ऑफ इंडिया चित्रपट रिलीज होणार आहे. भूज चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ठरली. अजय देवगण याचा चित्रपट १३ ऑगस्टला रिलीज होत आहे.

अधिक वाचा – 

अजय देवगन याचा भूज डिस्ने प्लस हॉटस्टार व्हीआयपीवर पाहता येईल. अजय देवगण याचा ओटीटीवर येणारा पहिलाच चित्रपट आहे.

अधिक वाचा – 

भारत-पाकिस्तान युद्धाला ५० वर्षे पूर्ण

भूजमध्ये संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, एमी विर्क, नोरा फतेही आणि शरद केळकर दिसणार आहेत. देवगण याच्या चित्रपटाची कथा १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील आहे. या वर्षी या युद्धाला ५० वर्षे पूर्ण होत आहेत.

अधिक वाचा – 

देवगण याने स्क्वॉड्रन लीडर विजय कर्णिकची भूमिका साकारली आहे.

अजय देवगण याचा भूज चित्रपट १३ ऑगस्टला रिलीज होणार.

पाकिस्तान ऑपरेशन चंगेज खान : 

पाकिस्तानने ऑपरेशन चंगेज खान यामध्ये १४ दिवसांत ३५ वेळा भूजमध्ये ९२ बॉम्ब हल्ला केला होता. तसेच २२ क्षेपणास्त्रांतून देखील हल्ला केला होता. पण, तेव्हा विजय कर्णिक यांनी धाडस केले होते.

भारतीय लढाऊ विमानांसाठी त्यांनी माधापूर गावातील ३०० महिलांना घेऊन एअर बेस बनवला होता. जेणेकरून याएअरबेसवर विमाने उतरू शकतील.

दिग्दर्शक अभिषेक दुधईया आहेत. या चित्रपटात सोनाक्षी सिन्हाची मुख्य भूमिका आहे.

हे ही वाचलतं का?  

पाहा व्हिडिओ –

दिलीप कुमार आणि पुण्याचा ऋणानुबंधअजय देवगण याचा भूज ओटीटीवर होणार प्रदर्शित

SCROLL FOR NEXT