पुढारी ऑनलाईन :अभिनेत्री शिल्पा शेट्टी, तिची बहीण शमिता शेट्टी आणि आई सुनंदा शेट्टी यांना फसवणूक प्रकरणी मुंबईतील अंधेरी न्यायालयाने नोटीस बजावली आहे. यामुळे शिल्पा शेट्टी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एका उद्योजकाने या तिघींवर फसवणुकीचा तक्रार दाखल केली हाेती. न्यायालयाने २८ फेब्रुवारी रोजी त्यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
फसवणुकीची तक्रार करणारे परहम आमरा हे एका ऑटोमोबाईल एजन्सीचे मालक आहेत. ज्यांनी तिघींविरोधात २१ लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार त्यांनी दाखल केली आहे. या तक्रारीत म्हटलं आहे की, शिल्पा शेट्टी वडील सुरेंद्र शेट्टी यांनी २०१५ मध्ये १५ लाख रुपये कर्ज दिले होते. हे कर्ज त्यांना जानेवारी २०१७ पर्यंत फेडायचे होते. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, शिल्पाच्या वडिलांनी कर्जासंबंधी शिल्पा (Shilpa Shetty) , शमिता आणि तिच्या आईला माहिती दिली होती. मात्र कर्ज फेडण्याआधीच शिल्पाच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर हे कर्ज फेडण्यास शिल्पा, शमिता आणि सुनंदा यांनी नकार देत असल्याचेही त्यांनी तक्रारमध्ये म्हटलं आहे.
शिल्पा शेट्टी गेल्यावर्षी पती राज कुंद्राच्या अटकेमुळे चर्चेत आली होती. जूनमध्ये राज कुंद्राला अश्लील व्हिडिओ तयार करून मोबाईल ॲपवर दाखवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा फसवणुकीच्या गुन्हेप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टी चर्चेत आहे.
हेही वाचलं का ?