Ganja Destroyed: आंध्र प्रदेशात पोलिसांची मोठी कारवाई, ८५० कोटींचा गांजा जाळला | पुढारी

Ganja Destroyed: आंध्र प्रदेशात पोलिसांची मोठी कारवाई, ८५० कोटींचा गांजा जाळला

 पुढारी ऑनलाईन : 
आंध्रप्रदेश पोलिसांनी ऑपरेशन परिवर्तन अंतर्गत  ८५० कोटी रुपयांचा गांजा जाळला (Ganja Destroyed). अनकापल्लीजवळील कोडुरू (विशाखापट्टणम) या गावात ही कारवाई करण्यात आली. आंध्र प्रदेशमध्ये कित्येक दशकांपासून सुरू असलेल्या गांजा तस्करीला कारवाईने चांगलाच चाप बसला आहे, अशी माहिती आंध्र प्रदेशचे पाेलिस महासंचालक गौतम सावंग यांनी दिली.

बेळगाव : अ‍ॅड. कमल किशोर जोशी यांची ग्राहक न्यायालयात न्यायाधीशपदी निवड

गौतम सावंग म्हणाले, ही कारवाई ऑपरेशन परिवर्तनचा एक भाग आहे. गतवर्षी ३१ ऑक्टोबरपासून आंध्रप्रदेश पोलिसांकडून ऑपरेशन परिवर्तन हा उपक्रम प्रभावीरित्या राबिवला जात आहे. (Ganja Destroyed)याचा उद्देश राज्यातील गांजाचा पुरवठा पूर्णपणे थांबवणे हा आहे.

हिजाब वादातील मुस्कानचे नाव आता उर्दू घराला ! मालेगावच्या महापौरांची घोषणा

छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि ओडिशा राज्‍यांमध्‍ये ड्रग माफियांकडून गाजांची माोठ्या प्रमाणावर तस्‍करी हाेते. ऑपरेशन परिवर्तन उपक्रमांतर्गत नोव्हेंबर 2021 ते फेब्रुवारी 2022 पर्यंत आंध्रप्रदेश पोलिसांनी ७५५२ एकरांवर पसरलेल्या भांगाच्या रोप नष्‍ट केली. सुमारे २ लाख किलो प्रक्रिया केलेला गांजा जप्त (Ganja Destroyed) केला आहे.  विशाखापट्टणममधील आंध्र-ओडिशा बॉर्डर एजन्सी क्षेत्राशी संबंधित विशेष अंमलबजावणी ब्युरो (एसईबी)  च्या सहकार्याने आंध्रप्रदेश पोलिसांनी ही कारवाई केली.

Heart Breakup : ‘व्हॅलेंनटाईन्स डे’ च्या महिन्यात सेलिब्रेट होणार हार्टब्रेक

गांजा तस्‍करीत गुंतलेल्या लोकांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यांना महसूल, आदिवासी कल्याण, कृषी आणि एकात्मिक आदिवासी विकास संस्थाकडून) पर्यायी उपजीविकेची संधी उपलब्ध करून दिली जाणार असल्याचेही गौतम सावंग यांनी सांगितले.

हेही वाचलंत का? 

Back to top button