राजकीय दबावातूनच रवी राणा यांच्यावर ३०७ कलमानुसार गुन्हा : नवनीत राणा | पुढारी

राजकीय दबावातूनच रवी राणा यांच्यावर ३०७ कलमानुसार गुन्हा : नवनीत राणा

अमरावती पुढारी वृत्तसेवा : कोणत्याही परिस्थितीत राजापेठ उड्‍डाणपुलावरच छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थापित करणार आहे. महापालिका आयुक्‍तांवर झालेल्‍या शाई फेक प्रकरणी सीएमओ आणि पालकमंत्री यांच्या दबावामुळे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. आमदार रवी राणा यांच्यावर ३०७ कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे, हे गुन्हे राजकीय दबावातून दाखल झाले आहेत, असा आराेप खासदार नवनीत राणा यांनी केला. त्‍या पत्रकार परिषदेत बाेलत हाेत्‍या.

यावेळी खासदार राणा म्‍हणाल्‍या की, सत्तेचा दुरूपयोग करून राजकीय दबावातून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. असे गुन्हे कोणावर दाखल केले तर उद्या रस्त्यावर उतरून याचा विरोध करण्‍यातील येईल.  राजापेठ पोलीस ठाणे 3 मिनिटांच्या अंतरावर आहे तरी एफआयआर करण्यास १० तास लागले कसे लागले?, असा सवालही नवनीत राणा यांनी केला. याबाबत केंद्र सरकारकडे तक्रार करणार आणि संसदेत याबाबत चैाकशीची मागणी करणार असल्याचेही त्‍यांनी सांगितले.

महापालिका आमसभेच्या ठरावावर निरुत्तर

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा राजापेठ उड्डाणपूलावर बसविण्याबाबत महापालिकेने परवानगी दिली नाही. याबाबत आमसभेत  युवा स्वाभिमानच्या नगरसेवकांनी प्रस्ताव ठेवला हाेता का ?  या प्रश्नावर खासदार नवनीत राणा निरुत्तर झाल्या. यावेळी  युवा स्वाभिमानचे राजीनामा दिलेले नगरसेवक शांत होते.

कोणीही बोलावले तर आयुक्त येतील का?

युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी मनपा आयुक्तांवर शाई फेक केलेली नाही, असा दावा करत एक व्यक्तीने फोन करुन आमदार राणा येणार असल्याचे सांगत बोलाविले. यानंतर आयुक्त आष्टीकर आले.  कोणीही बोलावले तर आयुक्त येतील का? असा सवाल नवनीत राणा यांनी केला.

हेही वाचलतं का?

Back to top button