मनोरंजन

Sai Lokur : गोव्याच्या किनाऱ्यावर सईचा बोल्ड बिकिनी अवतार ?

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या पर्वातील स्पर्धक आणि अभिनेत्री सई लोकुर ( Sai Lokur ) सध्या गोव्याच्या समुद्रकिनारी सुट्यांचा मनमुराद आनंद लुटत आहे. येथील काही बिकिनीतील काही बोल्ड फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री सई लोकुर (Sai Lokur) आपल्या तीन वर्षांनी भेटलेल्या मित्रांसोबत गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर सुट्टी एन्जॉय करतण्यास पोहोचली आहे. येथील सईचा बोल्ड आणि ब्युटिफुल बिकीनी अवतार चाहत्यांना पाहायला मिळाली. या फोटोत सईने निळ्या रंगाच्या बिकिनीसोबत एक अॅपर परिधान केले आहे. तसेच यावेळी तिच्या डोळ्यावर सुंदरसा चष्मा आणि पायात निळ्या रंगाचे सिल्पर दिसत आहे. या फोटोतील खास म्हणजे, दतिने बिकिनीत एकापेक्षा एक हॉट पोझ पाहायला मिळाल्या आहेत.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'हॉटनेस alert ?'. असे लिहिले आहे. गोव्याच्या किना-यावर सईचा बोल्ड आणि ब्युटिफुलने चाहत्यांना घायाळ केलं. यातील खास म्हणजे, शेअर केलेल्या व्हिडिओत ती समुद्राच्या पाण्यात बेधुंद होवून आनंद लुटताना दिसतेय. तर व्हिडिओ तिच्या केसांवरून हात फिरवताना आणि शेवटी डोळ्यावरून चष्मा काढून डोळा मारताना दियतेय. तर याचवेळी तिच्या बाजूला समुद्राच्या लाटा आणि एका गाण्याचा आवाज एकू येत आहे.

हा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर होताच चाहत्यासह मराठी कलाकारांनी भरभरून कॉमेंन्टस दिल्या आहेत. यात अभिनेत्री मेघा धाडे हिने सईच्या फोटोवर कॉमेन्ट करताना तीन हार्ट ईमोजी शेअर केले आहेत. एका नेटकऱ्याने 'Ooo la la ❤️? stunning!', 'Super hot?????', 'Hot ??', तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने 'Beautiful ❤', 'पुष्की……??', 'Very stunning and gorgeous ?', 'एकदम कडक ?'. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. याशिवाय अनेक चाहत्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर करत पोठोवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. याच दरम्यान एका युजर्सने 'अब्रु घालवलीस. कपडे नाहीत काय तुला?' अशा कडक शब्दांत सुनावले आहे.

याआधी सईने कारमधून जातानाचे काही फोटो शेअर केले होते. परंतु, ती गोव्याला जाणार असल्याचा उलगडा जाला नव्हता. सध्या चर्चेत आलेल्या फोटोंनी सध्या सई गोव्यात असल्याचे समजते. गोव्याला जाताना पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती दिसली होती.

सईने 'मिशन चॅम्पियन' या हिंदी चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर ती मराठी बिग बॉसमुळे चर्चेत आली आहे. 'सनम हॉटलाइन' या वेब सीरिजमध्येही ती दिसली होती. यानंतर सई तिच्या पती तिर्थदीप रॉयसोबत हनिमूनसाठी मालदिवच्या बीचवर पोहोचली होती. हे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले होते. याशिवाय सई सोशल मीडियावर सत्किय असून आपले अपडेटस चाहत्यांना शेअर करत असते.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT