पिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर : दस्त नोंदणीच्या वेळी मालमत्ता मालकीची तपासणी करणारी यंत्रणा उपलब्ध नसल्याने अनेकांची फसवणूक होत आहे. नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सर्चवर 2002 नंतरचे ऑनलाईन दस्त त्या-त्या विभागीय कार्यालयात उपलब्ध आहेत.
सन 2000 पासूनचे दस्त लवकरच उपलब्ध होणार आहेत. मात्र, त्या आधीच्या व्यवहारांची तपासणी कशी करायची असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
चिंचवड गावातील कामिनी हॉटेलजवळ तसेच पिंपरी गावात अशोक थिएटरजवळ भोसरीत लांडेवाडी येथे दुय्यम उपनिबंधक कार्यालय आहेत. स्टॅम्प ड्युटी नोंदणी तिचे पैसे ऑनलाईन भरता येतात.
मात्र, दस्त नोंदवण्यासाठी स्वतः जावे लागते मालमत्ता विकत घेणार्यानेच ती मालमत्ता बँकेला गहाण नाही ना ? निजोखमी आहे की कसे आदी गोष्टींची शहानिशा करून मगच खरेदी खत करावे लागते.
नोंदणीवेळी मालमत्ता मालकी तपासणीची यंत्रणा नसल्याने अनेकदा व्यवहारांमध्ये खरेदीदारांची फसवणूक होऊ शकते. आधार, थम इम्प्रेशन, फोटो आदी व्यवस्था हल्ली केली गेली आहे.
त्यामुळे बोगस व्यवहारांना आळा बसला आहे. टायटल बाबतच्या जागेच्या मालकी तपासणीची यंत्रणा उपलब्ध असायला हवी अशी मागणी आहे.
मालमत्ता बाबतचे व्यवहार खरेदीदार किंवा त्यांचे वकील सर्चद्वारे पाहू शकतात. सन 2002 नंतरचे ऑनलाईन दस्त त्या-त्या कार्यालयात उपलब्ध आहेत. लवकरच सन 2002 पर्यंतचे दस्त ऑनलाइन उपलब्ध होतील. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
-श्रावण हार्डीकर, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक
मालमत्ता विकत घेणार्यानेच ती मालमत्ता बँकेला गहाण नाही ना ? निजोखमी आहे की कसे आदी गोष्टींची शहानिशा करून मगच खरेदी खत करावे लागते. हल्ली सर्च वर टायटल शोधता येते.
-अॅड. बी. के. कांबळे
पूर्वी बोगस फोटो बोगस आयडी लावून फसवणूक केली जात होती. मात्र, सन 2002 पासून नोंदणी व्यवस्थेत अनेक बदल झाले आहेत. संगणकीकरण करण्यात आले आहे. थम इम्प्रेशन फोटो येऊ लागले आहेत. आधार पॅन कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे बोगस व्यवहारांना आळा घातला गेला आहे. सातबारामध्ये प्लॉट प्रॉपर्टी गोषवारा असतो. डाटा एंट्रीमध्ये सातबारा ओपन होतो. क्षेत्र शिल्लक पाहता येते फेरफार तलाठ्याकडे जातो. प्रथम मालमत्ता घेणार्याला टायटल मिळते. ऑनलाईन सर्च करता येते नोंदणी व मुद्रांक विभागाला टायटल तपासण्याचा अधिकार नाही मात्र ज्या प्रॉपर्टीचे टायटल क्लिअर असेल त्याचेच खरेदीखत करता येते.
-अॅड. शिवशंकर शिंदे