पायलटची भूमिका अभिमानास्पद : रकुल

पायलटची भूमिका अभिमानास्पद : रकुल

पुढारी ऑनलाईन डेस्क

अजय देवगण आणि अमिताभ बच्चन यांच्यासारखी तगडी स्टारकास्ट असलेला 'रनवे 34' आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटात रकुल प्रीत सिंह हिने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. प्रथमच पायलटच्या भूमिकेत असलेल्या रकुलने या अनुभवाबाबत सांगितले, ज्यावेळी आपण युनिफॉर्म परिधान करतो त्यावेळी निश्चितपणे एक अभिमानाची भावना येत असते. चित्रपटाची पटकथाही इतकी सुंदर आहे की ती ऐकताच मी चित्रपटाला तत्काळ होकार दिला होता. पायलटच्या भूमिकेसाठी मी योग्य प्रशिक्षणही घेतले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news