Isha Keskar : माझ्या नवऱ्याची बायको फेम ईशा नव्या लूकमध्ये (video) | पुढारी

Isha Keskar : माझ्या नवऱ्याची बायको फेम ईशा नव्या लूकमध्ये (video)

पुढारी ऑनलाईन : मराठीतील बोल्ड, ब्युटीफुल, बिनधास्त आणि अभिनेत्री ईशा केसकरचा ( Isha Keskar ) शेर शिवराज चित्रपट २२ एप्रिल २०२२ रोजी सिनेमा घरात दस्तक देताच चाहत्यांनी भरभरून प्रेम दिलं. हा चित्रपटात ईशाने महाराणी सईबाई भोसले यांची मुख्य भूमिका साकारले आहे. शेर शिवराज चित्रपटाचे प्रीमियरमधील ईशाचा घागरा चोळी लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अभिनेत्री ईशा केसकरने (isha keskar) नुकतेच तिच्या इंन्स्टाग्रामवर शेर शिवराज चित्रपटाचे प्रीमियरमधील लाल रंगाच्या घागरा चोळीमधील काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. या फोटोत तिने लाल रंगाच्या घागरा चोळीवर हिरव्या रंगाची ओढणी परिधान केली आहे. ईशाने शेअर केलेल्या व्हिडिओ शेर शिवराज चित्रपटाचा एक फोटो दिसत आहे. याशिवाय तिने यावेळी स्वत: च्याच भोवती गोल फिरून चाहत्यांचे हात जोडून आभार मानले आहेत.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘शेर शिवराज प्रीमियर ✨ ईशाचा मोहक अंदाज!❤️’. असे लिहिले आहे. यातील खास म्हणजे, तिच्या मराठमोळ्या लूकची जोरदार चर्चा सोशल मीडियावर होत आहे. यावेळी घातलेल्या केसांच्या आंबडा, ड्रेस आणि ओढणीवरील डिझाईनने तिचे सौदर्य खुलून दिसत आहे. हा मराठमोळा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यासह मराठी कलाकारांनी भरभरून कॉमेन्टस केल्या आहेत. यात एका युजर्सने ईशाच्या खास करून स्माईलचे कौतुक केलं आहे. तर दुसऱ्या एका युजर्सने ‘मस्त’, ‘क्युट’ असे म्हटले आहे. याशिवाय काही युजर्सनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत.

याआधीही ईशाच्या इंन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या स्टाईलमधील फोटो पाहायला मिळत आहेत. ईशाचा चाहत्या वर्ग देखील मोठा आहे. इंन्स्टावर तिचे ५ लाख ३२ हजार फालोवर्स आहेत. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांचा शेर शिवराज चित्रपटात तिने महाराणी सईबाई भोसले यांची भूमिका उत्कृष्टपणे पार पाडली आहे. सईबाईच्या भूमिकेसाठी तयार होताना तिचा एक व्हिडिओदेखील इन्स्टावर पाहायला मिळत आहे.

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने ‘तुमच्या वाटेतला अडथळा न होता, तुमच्या वाटेवर तुमची सावली बनून रहायचं होतं…’ असे लिहिले आहे. हा व्हिडिओवर चाहत्यानी भऱभरून प्रेम केलं आहे. या चित्रपटातील सईबाईची भूमिका खूपच गाजली आहे. याशिवाय ईशाने छोट्या पडद्यावरील ‘जय मल्हार’ मालिकेतील माता बानुबाईं आणि ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मधील शनायाची भूमिका गाजल्या आहेत.

हेही  वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajshri Marathi (@rajshrimarathi)

 

View this post on Instagram

 

A post shared by Isha CK ईशा (@ishagramss)

 

View this post on Instagram

 

A post shared by Isha CK ईशा (@ishagramss)

Back to top button