rubina dillaik 
मनोरंजन

rubina dillaik : जणू स्वर्गाची अप्सराचं! एक एक बोल्ड अदा पाहून…

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

नेहमी फॅशनच्या मूडमध्ये राहणारी आणि आपल्या बोल्ड फोटोंनी चर्चेत राहणाऱ्या रुबिना दिलैकने (rubina dillaik) फॅन्सची मने जिंकली आहेत. नुकताच तिने तिचे गोल्डन डार्क रेड कलरमध्ये जे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवर फॅन्सची प्रतिक्रिया पाहायला मिऴतेय. आता पुन्हा रुबिना दिलैकचा (rubina dillaik) सिझलिंग अवतार पाहायला मिळाला आहे. बिग बॉसची ही विजेतीदेखील ठरली होती. जाणून घेऊया तिच्याविषयी…

rubina dillaik

रुबीना दिलैकने नवे फोटो शेअर केले आहेत. एथनिक आउटफिटमध्ये तिने खूप सुंदर पोझ दिले आहेत. रुबीनाने गोल्डन आणि रेड कॉम्बिनेशन असलेल्या पारंपरिक ड्रेसमध्ये किलर पोझ दिलीय.  ती गोल्डन आणि रेड कलरच्या ब्लाऊजमध्ये सुंदर दिसतेय.

rubina dillaik

ही फॅशन स्टायलिस्ट अनुराधा खुरानाची स्टाईल आहे. रुबिना कुरळ्या आणि सैल केसांमध्ये आणखी सुंदर दिसतेय. रुबीनाचा स्कर्ट अनेक सोन्याच्या साखळ्यांनी सजवलेला होता. तिने अनेक गोल्डन चोकर आणि नेकलेस, गोल्डन बांगड्या आणि ॲक्सेसरीझ घातले आहेत.

rubina dillaik

रुबिना न्यूड आयशॅडो, ब्लॅक आयलायनर, मस्करा आयलॅशेस, कोरीव भुवया, न्यूड लिपस्टिक शेडमध्ये ती रुप आणखी बहरलं होतं. रुबिनाचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत, जे तिच्या फोटोंवर कमेंट करताना दिसतात.

'संस्कारी बहू' म्हणून तिने प्रेक्षकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले आहे. रुबिनाचे चाहते आज देशभरात आहेत. त्याच्या एका झलकसाठी चाहते वेडे झाले आहेत. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाशी कनेक्ट राहते.

रुबिनाचा अप्सरा लुक

रुबिनाने गुरुवारी इन्स्टाग्रामवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक शेअर केलीय. यामध्ये ती अप्सराच्या लूकमध्ये दिसत आहे.

बॉलिवूड डेब्यूमुळे चर्चेत

रुबिना सध्या तिच्या बॉलिवूड डेब्यूमुळे चर्चेत आहे. ती लवकरच 'अर्ध' चित्रपटात दिसणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर लॉन्च करण्यात आले. ज्यामध्ये रुबिना एका वेगळ्या अवतारात दिसली. या चित्रपटात रुबिनासोबत कुलभूषण खरबंदा, राजपाल यादव आणि हितेन तेजवानी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय रुबीना काही काळापूर्वी अनेक म्युझिक व्हिडिओंमध्येही दिसली आहे. नुकतेच त्याचे 'इश्क' हे गाणे रिलीज झाले आहे. त्याला चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळाले आहे.

हेही वाचलं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT