पूजा हेगडे साऊथची 'बुट्टा बोम्मा गर्ल'❤❤❤ कशी झाली? | पुढारी

पूजा हेगडे साऊथची 'बुट्टा बोम्मा गर्ल'❤❤❤ कशी झाली?

पुढारी ऑनलाईन डेस्क

बॉलिवूडमध्ये मोजकेचं चित्रपट करणारी पूजा हेगडे साऊथच्या टॉप टेन अभिनेत्रींपैकी एक आहे. तजेलदार सौंदर्यामुळे ओळखली जाणाऱ्या पूजाने पहिले रॅम्पवॉक अभिनेता रणबीर कपूरसोबत केले होते. तुम्हाला माहिती आहे का, पूजा हेगडे हिचा जन्म १३ ऑक्टोबर, १९९० रोजी मंगलोर कर्नाटक येथे झाला. तिने एमएमके कॉलेजमधून एमकॉमची पदवी घेतलीय. सध्या तिच्या राधेश्याम या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटात तिच्यासोबत प्रभास आहे.

पूजा हेगडे

पूजाने २००९ च्या मिस इंडिया कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला होता. पण, मिस इंडिया जिंकण्याच्या आधीच ती स्‍पर्धेबाहेर पडली. तिने पुन्हा २०१० मध्ये अर्ज केला. त्यावेळी २०१० च्या मिस यनिव्हर्स इंडिया स्पर्धेत ती उपविजेती ठरल. मिस इंडिया स्पर्धेच्या वेळेचा अनुभव सांगताना तिनं म्हटलं होतं की, त्यावेळी मी खूप निराश होते. रॅम्प हॉक, कॅट वॉक करायचा होता. एलियन कन्सेप्ट होतं.

पूजा हेगडे

ButtaBomma girl

२०१२ मध्ये तिने तमिळ सुपरहिरो चित्रपट mugamoodi (२०१२) मध्ये अभिनय केला. यामध्ये ती अभिनेता जीवासोबत दिसली होती. २०१४ मध्ये तिने नागा चैतन्यसोबत रोमँटिक कॉमेडी चित्रपट oka laila kosam मध्ये काम केलं. या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून साऊथचा फिल्मफेअर ॲवॉर्ड मिळाला होता.

पूजा हेगडे

Vaikuntapuram या चित्रपटात तिने अल्लू अर्जुनसोबत काम केलं होतं. या चित्रपटातील अल्लू-पूजावर चित्रीत करण्यात आलेलं बुट्टा बोम्मा (ButtaBomma) हे गाणे आजही लोकप्रिय आहे. या गाण्यानंतर ती ButtaBomma girl म्हणून ओळखली जाऊ लागली.

पूजा हेगडे

Duvvada Jagannadham, Maharshi, Aravinda Sametha Veera Raghava, Gaddalakonda आणि Ganesh यासारख्या हिट चित्रपटांमध्येही तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. त्यानंतर २०१६ मध्ये ऋतिक रोशनसोबत आशुतोष गोवारीकरांचा चित्रपट मोहेंजोदारोमध्ये काम केलं होतं.

पूजा हेगडे

२०१९ मध्ये अक्षयकुमार सोबत हाऊसफुल्ल ४ तिने केला होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. २०२१ मध्ये तिने अखिल अक्किनेनीसोबत रोमँटिक कॉमेडी चित्रट “मोस्ट एलिजिबल बॅचलर” मध्ये अभिनय केला होता.

प्रभाससोबत रोमँटिक चित्रपट राधेश्याममध्ये ती दिसणार आहे. चिरंजीवी आणि राम चरणसोबत कोराताला शिव दिग्दर्शित आचार्य तसेच रणवीर सिंह, जॅकलीन फर्नांडिससोबत रोहित शेट्टी दिग्दर्शित  सर्कस या हिंदी चित्रपट ती दिसेल.

पूजा हेगडे

रणबीरसोबत पहिलं रॅम्पवॉक

पूजाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, तिचा पहिला रॅम्पवॉक अभिनेता रणबीर कपूरसोबत होता. तो एक चांगला अभिनेता आहे. त्यावेळी मी खूप निराश होते. माझ्याकडून काही तरी चूक झाल्यानंतर त्याला मी आय एम सॉरी म्हणत सुटले. पण, त्याने नो सॉरी म्हणत सांभाळून घेतलं. रणबीर कपूरसोबत तिने हिरो मेस्ट्रोसाठी जाहिरातीत अभिनय केला होता.

पूजा हेगडे

पूजा भरटनाट्यम डान्सर आहे. तिने बीएमडब्ल्यू ५ सीरीजची पहिली कार खरेदी केली होती.

पूजा हेगडे

ऋतिक रोशनने खायला लावला खडू

मोहोंजोदारोच्या शूटिंगवेळी ऋतिक रोशनने पूजाची खिल्ली उडवली होती. तिला मजेत खडू (चॉक) खायला दिलं होतं. हे प्रोटिन बिस्किट आहे, असे म्हणत तिला ह खाण्यास दिलं होतं. ऋतिकचंही ऐकून तिने चॉक खाल्ला. पण, शेवटी ऋतिकने तिला ते चॉक असल्याचं सांगितलं होतं. 

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Hegde (@hegdepooja)

 

View this post on Instagram

 

A post shared by Prabhas (@actorprabhas)

Back to top button