मनोरंजन

monalisa bagal : भिरकीटची रेश्मा जिंकतेय प्रेक्षकांची मने

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : क्लासिक एंटरप्राईज प्रॉडक्शन प्रस्तुत, 'भिरकीट' १७ जूनला प्रदर्शित झाला. (monalisa bagal ) हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करतच आहे, पण तसेच या चित्रपटातील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळतंय. असचं एक चित्रपटातीलं गोड, सुंदर पात्रं म्हणजे रेश्मा. जे साकारलंय अभिनेत्री मोनालिसा बागल हिने. (monalisa bagal )

'भिरकीट' चित्रपटाची गोष्ट ग्रामीण भागातील, एका छोटयाशा खेड्यात घडते. गाव म्हंटलं की गावाकडची गोष्ट, तेथील लोकांची बोलीभाषा, शैली ही पाहायला मिळतेच आणि मोनालिसाने साकारलेलं रेश्माचं पात्रं हे फारच विशेष आहे. तिचा आवाज, तिची गावाकडची भाषा आणि अर्थात अभिनय पाहायला खूप छान वाटलं अशा प्रतिक्रिया तिला तिच्या चाहत्यांनी दिल्या.

या चित्रपटाने मोनालिसाला काय दिलं असा प्रश्न तिला विचारलेला असताना तिने सांगितले की, "या सिनेमाने मला अप्रतिम अनुभव दिला. दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी मला या सिनेमाने दिली. विशेष करुन गिरीश कुलकर्णी, हृषिकेश जोशी, कुशल बद्रिके यांच्यासोबत काम करायला मिळालं याचा आनंद वाटतोय. तानाजीसोबत यापूर्वी पण काम केलं आहे, त्यामुळे त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव हा भन्नाटच असतो. सहकलाकारापेक्षा मित्र या नात्याने आम्ही एकत्र काम करतो म्हणून रेश्मा आणि मच्या साकाराताना मजा आली.

'कॅप्टन ऑफ दि शिप' अनुप सरांच्या दिग्दर्शन कौशल्याविषयी सर्वजण भरभरुन बोलत आहेत आणि ते खरंच आहे. इतक्या साऱ्या कलाकारांना एकत्र घेऊन चित्रपटाची गोष्ट मांडणं सोपं नाही पण त्यांनी ते उत्तमरित्या केलं. त्यासाठी त्यांचे विशेष कौतुक व्हायला हवं. सिनेमाचं संगीत तर कमालीचं आहे. नकाश अजिज यांचं गाणं खूप भारी वाटलं. कोरिओग्राफर राहुल-संजीव यांच्यासोबतचा हा माझा तिसरा सिनेमा, त्यामुळे त्यांच्यासोबत पुन्हा काम करायला मिळालं. अशा बऱ्याच आनंदी, मजेशीर, समाधानकारक गोष्टी 'भिरकीट'ने मला दिल्या."

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT