तुझ्या दर्शनाची लागलीसे आस | पुढारी

तुझ्या दर्शनाची लागलीसे आस

पुणे : पुढारी वृत्तसेवा: ‘तुझ्या दर्शनासाठी आतुरली पुण्यनगरी… जनसुरक्षेसाठी सज्ज हा पहारेकरी,’ असा अनुभव बुधवारी सायंकाळी संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याप्रसंगी पाहण्यास मिळाला. संचेती चौकात पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दोन्ही पालख्यांचे स्वागत केले. या वेळी पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे, वाहतूक विभागाचे उपायुक्त राहुल श्रीरामे तसेच इतर वरिष्ठ अधिकार्‍यांसह कर्मचारी उपस्थित होते.

पालखी सोहळ्यासाठी पुणे पोलिसांनी तब्बल चार हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. एसआरपीएफ, होमगार्ड देखील मदतीला आहेत. ड्रोनद्वारे वारी सोहळ्यावर नजर ठेवली जाते आहे. चोरीच्या घटना रोखण्यासाठी विशेष खबरदारी घेतली आहे. बुधवारी दोन्ही पालख्या संचेती चौकात आल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने बंदोबस्ताचा पोलिस आयुक्तांनी आढावा घेतला.

दोन वर्षांनंतर पालखी सोहळा होत असल्यामुळे यंदा नागरिकांची सोहळ्यात मोठी गर्दी आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी योग्य नियोजन केले आहे. बुधवारी पालख्यांचे आगमन पुण्यात झाल्यानंतर गुरुवारी त्या शहरात मुक्कामी असणार असून, शुक्रवारी त्यांचे प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने होणार आहे. वाहतूक पोलिसांनी सकाळी सहा वाजल्यापासूनच बंदोबस्त तैनात केला होता. पालखी मार्गावर तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक बदल करण्यात आला होता.

हेही वाचा

नांदेड: काँग्रेस कार्यकर्ते सैरभैर, तर भाजपमध्ये उत्साहाला उधाण

नाशिक : शिवडे येथे वीज अंगावर पडून तरुण ठार

नगर : चिंचपूर पांगुळ परिसरात पाऊस

Back to top button