सोलर कार : शिक्षकाने बनवली सोलर कार

सोलर कार : शिक्षकाने बनवली सोलर कार

श्रीनगर : काश्मीरमधील बिलाल अहमद या गणिताच्या शिक्षकाने सौरऊर्जेवर चालणारी कार तयार केली आहे. गेली 11 वर्षे ते अशी कार बनविण्यासाठी प्रयत्न करीत होते व आता त्यांना यामध्ये यश मिळाले आहे. काश्मीरमधील वृत्तछायाचित्रकार बासित जरगर यांनी ट्विटरवर दोन पोस्ट्स शेअर करून बिलाल अहमद यांच्या या कामगिरीची माहिती दिली आहे. आपल्याला नव्या गोष्टी करण्याचा छंदच आहे, असे बिलाल यांनी म्हटले आहे. त्यांना आपले सोलर कार मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू करण्याचीही इच्छा आहे.

या युनिटचे नाव 'वायएमसी' असे ठेवण्याचीही त्यांची इच्छा आहे. त्यांना तीन व सात वर्षांची मुले असून, त्यांची नावे योशा व माईशा अशी आहेत. योशा माईशा कार'चं संक्षिप्त रूप म्हणजे 'वायएमसी'. सध्या ते या सोलर कारची क्षमता वाढविण्यासाठी उपयुक्त ठरेल अशा लिथियम बॅटरीच्या शोधात आहेत. बिलाल यांनी यापूर्वी एलपीजी सेफ्टी ऑटोमेटिक स्टॉपरही बनविला होता. तो स्टॉपर आणि आताची सोलर कार या दोन्हीच्या पेटंटसाठी त्यांनी नोंदणी केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news