नाशिक : कारच्या धडकेने रिक्षातील प्रवासी महिला ठार | पुढारी

नाशिक : कारच्या धडकेने रिक्षातील प्रवासी महिला ठार

नाशिक : गडकरी सिग्नल येथे कारने धडक दिल्याने रिक्षातील 45 वर्षीय प्रवासी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.21) पहाटे घडली. मंगला हरिश्चंद्र शिंदे (45, रा. तानाजी चौक, दिंडोरी रोड) यांचा या अपघातात मृत्यू झाला. मंगळवारी (दि.21) जुने सीबीएसकडून गडकरी सिग्नलच्या दिशेने मंगला शिंदे या रिक्षातून जात होत्या. त्यावेळी कारने (एमएच 17, एझेड 5093) रिक्षास धडक दिल्याने त्यांना गंभीर मार लागला. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली.

हेही वाचा :

Back to top button