नेटफ्लिक्सवरील सेक्रेड गेम्स वेबसीरीज जशी लोकप्रिय ठरलीय. त्याचबरोबर, त्यातील कलाकारही चर्चेत राहिली. सेक्रेड गेम्सचे दोन्ही गाजले. ही सीरिज आजही पाहिली तर कंटाळा येत नाही. वेब सीरिजमधील हॉट सीन्स आणि डायलॉग्जमुळे चर्चेत राहिली. खऱ्या अर्थाने चर्चा झाली ती म्हणजे, इंटिमेट सीनची. एका मुलाखतीत कुब्रा सैत हिने इंटिमेट सीनविषयीचा खुलासा केलाय. कुब्रा सैतने नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत दिलेल्या इंटिमेट सीनवर भाष्य केलंय. तिने यामध्ये कुकू नावाची व्यक्तीरेखा साकारली होती.
कुब्राने कुकूची भूमिका साकारली. यामध्ये तिने नवाजुद्दीनसोबत तब्बल ७ वेळा इंटिमेट सीन दिले होते. 'हा सीन झाल्यानंतर मी खूप रडले होते', असं ती म्हणाली.
सेक्रेड गेम्समध्ये कुब्राने कुकू या ट्रान्सजेंडरची भूमिका साकारली होती. या भूमिकेला प्रेक्षकांकडून दाद मिळाली. तिचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलाच. या सीरिजमध्ये कुब्रा आणि नवाजुद्दीनचा एक इंटिमेट सीन शूट करण्यात आला होता. मात्र, हा सीन झाल्यानंतर कुब्रा जमिनीवर बसून ढसाढसा रडली.
सेक्रेड गेम्समध्ये इंटिमेट सीन देणं कलाकारांसाठी तितकं सोपं नव्हतं. नवाजुद्दीनसोबत तिला इंटिमेट सीन करताना अनेक अडचणी आल्या. शेवटी मी कंटाळले आणि रडू लागले. तब्बल ७ वेळा आम्ही हा सीन शूट केला. असं ती म्हणाली.
इंटिमेट सीन ७ वेगवेगळ्या अँगलने शूट करण्यात आला. असे करण्यामागे दिग्दर्शक अनुराग कश्यपची इच्छा असल्याचे ती म्हणाली होती. हा सीन परफेक्ट होण्यासाठी दोघांनीही मेहनत घेतली.
अनुराग कश्यपच्या इच्छेप्रमाणे प्रथम एक सीन शूट करण्यात आला. त्यानंतर लगेचच दुसरा सीनदेखील शूट करण्यात आला. असं एक-एक करत त्यांनी सात वेळा हा सीन शूट केला. परंतु, अखेर मी कंटाळले. माझ्यातील सहनशक्ती संपली आणि मला रडू लागले. अनुराग कश्यप माझ्या जवळ आले आणि त्यांनी मला धन्यवाद म्हटले."
"मी रडत असतानाच नवाजुद्दीन माझ्या जवळ आले. ते म्हणाले -तुला बाहेर जाण्याची गरज आहे. कारण, मला माझ्या उर्वरित सीनचं शूट करायचं आहे. मला खूप आश्चर्य वाटलं. त्यांच्या या बोलण्याने मी खूप थक्क झाले होते."
सैत ही सेक्रेड गेम्सशिवाय सलमान खानच्या 'रेडी' या चित्रपटता दिसली होती. 'जवानी जानेमन', 'वो चमकते सितारे', 'डॉली किटी' या चित्रपटांमध्ये ती दिसली आहे.