Gauri Khan : आर्यन अडकल्याने गौरी खानने अखेर निर्णय घेतलाच ! | पुढारी

Gauri Khan : आर्यन अडकल्याने गौरी खानने अखेर निर्णय घेतलाच !

पुढारी ऑनलाईन डेस्क

क्रूझ ड्रग प्रकरणानंतर आर्यन खान जवळपास महिनाभर घरापासून दूर आहे. तो मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये आहे. अलीकडेच २१ऑक्टोबर रोजी शाहरुख खानने जाऊन आर्यनची भेट घेतली. या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते. या भेटीत आर्यन आणि शाहरुख दोघेही भावूक झाले. आता बातम्या येत आहेत की आर्यनची आई गौरी खान (Gauri Khan) देखील आपल्या मुलासाठी चिंतेत आहे आणि ती लवकरच मुलाला भेटण्यासाठी तुरुंगात जाऊ शकते.

असे झाल्यास, २ ऑक्टोबरनंतर गौरी (Gauri Khan) आपल्या मुलाला समोरासमोर पाहण्याची पहिलीच वेळ असेल. याआधी आर्यन आणि गौरी फक्त व्हिडिओ कॉलवर बोलत होते आणि या संभाषणात गौरी खान खूप भावूक झाली होती. गौरीने आर्यनला लवकरच बाहेर काढण्याचे आश्वासन दिले होते. याआधी असे वृत्त होते की गौरी खान (Gauri Khan) तिच्या वाढदिवसानिमित्त आपल्या मुलाला भेटण्यासाठी तुरुंगात जाऊ शकते.

दरम्यान, आर्यन खानच्या जामीन अर्जावरही आजही निर्णय होऊ शकलेला नाही. त्याच्या जामीन अर्जावर आता उद्या होणार आहे. आज झालेली सुनावणी पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यालाय याआधी सत्र न्यायालयाने आर्यनच्या न्यायालयीन कोठडीत ३० ऑक्टोबरपर्यंत वाढ केली होती. आर्यनला उद्या जामीन मिळाला नाही तर आर्यनला ३० ऑक्टोबरपर्यंत तुरुंगातच राहावे लागणार आहे.

२ ऑक्टोबर रोजी ड्रग तपास संस्थेने आर्यन खानला क्रूझ रेव्ह पार्टीतून अटक केली होती. आर्यनसोबत त्याच्या अनेक मित्रांनाही एजन्सीने अटक केली होती. या लोकांमध्ये अरबाज सेठ मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांची नावे आहेत. आता आर्यन खान तुरुंगातून कधी बाहेर येतो हे पाहावे लागेल.

हे ही वाचलं का?

Back to top button