कागर फेम शुभंकर तावडे याचे विशेष मुलांसोबत बर्थ डे सेलिब्रेशन

कागर फेम शुभंकर तावडेचं विशेष मुलांसोबत बर्थ डे सेलिब्रेशन
कागर फेम शुभंकर तावडेचं विशेष मुलांसोबत बर्थ डे सेलिब्रेशन
Published on
Updated on

अभिनेता शुभंकर तावडे याचा वाढदिवस २६ ऑक्टोबरला असतो. काेराेना पँडेमिक काळात वाढदिवस कसा साजरा करावा, ह्याचे एक उत्तम उदाहरण त्याने दिले. यंदा त्‍याने आपला वाढदिवस विशेष मुलांसह साजरा केला. मंगळवारी मुंबईतल्या उमंग चॅरिटेबल ट्रस्टच्या विशेष मुलांसह शुभंकरने आपला वाढदिवस साजरा केला.

शुभंकरने ह्या मुलांसोबत केक कापला. त्यांना भेटवस्तू दिल्या. आणि एक छोटेखानी गेट टुगेदर पार्टी साजरी करून मुलांसह आनंद साजरा केला. शुभंकर याविषयी म्हणतो, गेल्या एक-दीड वर्षात आपल्या सगळ्यांच्या शारीरिक-मानसिक स्वास्थ्यावर घरात बसून खूप परिणाम झाला; मग ह्या विशेष मुलांवर ह्या वातावरणाचा कसा परिणाम झाला असेल? त्यामुळेच आता बंधनं शिथिल झाल्यावर त्यांची शाळा उघडताना त्यांना आनंदित करावे. या विचाराने मी माझ्या वाढदिवसाचं निमित्त साधून त्यांच्यासाठी छोटेखानी पार्टी ठेवली.

शुभंकरने मुलांना छोट्या कुंड्या-बियाणाचं वाटप केलं. शुभंकर म्हणाला, मला झाडं लावायला खूप आवडतं. मुलांवर छोट्या-छोट्या गोष्टीतून संस्कार करावे लागतात. मी त्यांना बियाणं कसं पेरावं आणि त्याची काळजी कशी घ्यावी; मग रोपं कसं उगवतं हे समजावून सांगितल्यावर ते गिफ्ट त्यांना खूप आवडलं.

या पार्टीत शुभंकरसोबत मुलं अगदी मिसळून गेली होती. त्याच्यासोबत मुलांनी मराठी गाण्यांवर डान्सही केला. शुभंकर या अनुभवाबद्दल म्हणाला, मोकळ्या आभाळात उडणाऱ्या पक्षाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होता. हा निरागस आनंद पाहून मी ठरवलं की, वर्षातून एकदा तरी त्यांना भेटलंच पाहिजे. त्यांच्याकडून खूप सकारात्मक उर्जा घेऊन आता मी कामाला लागणार आहे.

शुभंकर तावडेचे '8 दोन 75', 'दिल दोस्ती दुनियादारी', 'फोर ब्लाइंड मेन' हे सिनेमे लवकरच प्रदर्शित होणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news