मनोरंजन

srk love story ♥️ ‘ती’ हिंदू असल्याचं माहीत असतानाही शाहरुख खानने गौरीला…

स्वालिया न. शिकलगार

बॉलिवूडमध्‍ये शाहरुख खान आणि त्‍याची पत्‍नी गौरी खान हे बॉलिवूडमध्‍ये क्‍यूट कपल्‍सपैकी एक आहेत. इतक्या वर्षांचा त्‍यांचा प्रवास आजही सुरळीतपणे सुरू आहे. २५ ऑक्‍टोबर, १९९१ मध्‍ये दोघांनी विवाह केला. शाहरुखचा आज २ नोव्‍हेंबरला वाढदिवस आहे. (srk love story) या लव्ह बर्डची अनोखी प्रेमकाहीणी एखाद्या फिल्मी कहाणीपेक्षी कमी नाही. 'ती' हिंदू आहे हे माहित असतानाही शाहरुख खानने 'तिला' प्रपोज करण्याचं धाडस केलं.♥️♥️♥️♥️ (srk love story)

खानशी विवाह करण्‍यापूर्वी गौरी खानचं नाव गौरी छिब्बर होतं. गौरी आज एक यशस्‍वी उद्‍योजिका आहे. गौरी रेड चिलीज एंटरटेनमेंटची को-ओनर आहे. तिने आपला पहिला चित्रपट 'मैं हूं ना' २००४ मध्‍ये प्रोड्यूस केला होता. इंटीरियर डिझायनर गौरी खानने आपलं करिअर २०१२ मध्‍ये सुरू केलं होतं.

गौरी खान आणि किंग खान याची लव्‍ह स्‍टोरीही हटके आहे. परंतु, त्‍यांच्‍या आयुष्‍यात असं एक वळण आलं की, दोघांचा ब्रेकअप झाला. पण, दोघे पुन्‍हा भेटणार, हे कोणाला माहित होतं. किंग खान आणि गौरी शाळेत असल्‍यापासून एकमेकांवर प्रेम ♥️ करत होते. आणि अनेक वर्षांच्‍या अफेअरनंतर दोघांनी आपल्‍या प्रेमाबद्‍दल ♥️ ♥️ घरच्‍या मंडळींना सांगितले. किंग खान मुस्लिम असल्‍याने गौरीच्‍या घरच्‍यांना हे लग्‍न मान्‍य नव्‍हतं.

गौरीप्रमाणेच किंग खानही दिल्लीचा रहिवासी होता. दोघांची पहिली भेट १९८४ मध्‍ये एका कॉमन फ्रेंडच्‍या पार्टीत झाली. त्‍यावेळी किंग खान फक्‍त १८ वर्षांचा होता आणि गौरी १४ वर्षांची. मजेशीर म्‍हणजे किंग खानच्‍या लाजाळू स्‍वभावामुळे गौरीसमोर तो आपलं प्रेम व्‍यक्‍त करू शकला नाही. गौरी ज्‍या-ज्‍या पार्टीत जायची, तेथे पहिल्‍यांदा तो हजर राहायचा. गौरी आणि किंग खानचं फ्रेंड सर्कल कॉमन होते. मित्रांच्‍या मदतीने आणि थोड्‍याशा हिम्‍मतीने त्‍याने गौरीचा नंबर मागितला आणि गौरीने देखील आपला फोन नंबर किंग खानला  दिला.

त्‍यानंतर दोघांचं बोलणं नित्‍याचचं झालं. थोड्‍या दिवसांनंतर किंग खान आणि गौरीमध्‍ये वाद होऊ लागले. हे वाद अधिकच वाढल्‍याने गौरी दिल्ली आणि किंग खानला सोडून मुंबईत आली. किंग खान सुरुवातीला गौरीबद्‍दल खूप पझेसिव्‍ह होता. दुसर्‍यांशी बोलणे आणि केस मोकळे ठेवणं हे त्याला आवडायचं नाही. या गोष्‍टीला कंटाळून गौरीने किंग खान शी ब्रेकअप घेतला होता. नंतर तो तिला भेटण्‍यासाठी पुन्‍हा मुंबईत गेला. गौरीसाठी त्याला कसरत करावी लागली. तिच्‍या आई-वडिलांना इम्‍प्रेस करण्‍यासाठी त्‍याने आपण हिंदू असल्‍याचं सांगितलं होतं.

दोघांनाही रडू कोसळले

किंग खान ला ज्‍यावेळी समजलं की, गौरी मुंबईला निघून गेली. त्‍यावेळी तोही मुंबईत आला. त्‍यावेळी त्याच्याजवळ पैसेही नव्‍हते. पैशांची जमवाजमव करून गौरीला शोधण्‍यासाठीत तो मुंबईत पोहोचला. त्याने गौरीला खूप शोधलं, पण तिचा पत्ता लागेना. निराश होऊन तो मुंबईच्‍या एका बीचवर जाऊन बसला. त्‍याचवेळी तेथे त्‍याला गौरी दिसली. ती आपल्‍या मैत्रीणींसोबत तेथे आली होते. त्‍यांनी एकमेकांना पाहिले आणि दोघांनाही रडू कोसळले. त्‍यानंतर दोघांनीही लग्‍न करण्‍याचा निर्णय घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT