मनोरंजन

गायत्री दातारचा प्रियकर तिचा ‘हा’ प्रस्ताव मान्य करणार का?

स्वालिया न. शिकलगार

मुंबई; पुढारी ऑनलाईन : अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला 'बिग बॉस' सीझन ३ अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला. या घरात आता नुसता धुमाकूळ पाहायला मिळतोय. आता गायत्री दातारची चर्चा होताना दिसतेय. गायत्री दातार 'तुला पाहते रे' या मालिकेतून घराघरात पोहोचली. ती या घरात आता बऱ्यापैकी रुळली असून तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

ती म्हणजे दातार सध्या प्रेमात पडली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ती कोणाच्या प्रेमात पडली आहे? तिच्या प्रियकराचे नाव ऐकाल तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.

खुद्द बिग बॉस हे तिचे प्रियकर आहेत.

बसला ना आश्चर्याचा धक्का? परंतु ही गोष्ट खरी आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओच्या माध्यमातून याचा खुलासा झाला आहे.

या व्हिडिओमध्ये ती आपल्या प्रियकराबरोबर प्रेमाच्या गोष्टी करताना दिसत आहे. बिग बॉससमोर ती चक्क लाजतेय, त्यांच्यावर रुसतेय.

आता दातारचा प्रियकर तिचा हा प्रस्ताव मान्य करणार का? हे पाहण्याची सगळ्यांना उत्सुकता आहे.

SCROLL FOR NEXT