rakhi sawant  
मनोरंजन

बिग बॉस मराठी -4 : किरण मानेंनी केले राखी सावंतचे कौतुक

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस मराठीच्या घरात आज कॅप्टन पदाच्या उमेदवाराची नियुक्ती होणार आहे आणि त्याचसाठी सदस्य अगदी मन लावून तयारी करत आहेत. आपला डान्स कसा उत्तम होईल याच्या प्रयत्नात आहेत. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमधून दिसून आले की, किरण माने, विकास आणि अपूर्वा यांनी सामे या गाण्यावर धमाकेदार डान्स सादर केला . त्यावर राखीनी त्यांची प्रशंसा देखील केली. तर अमृता धोंगडे आणि विशाल निकम याने देखील परफॉर्मन्स सादर केला.

राखी अमृता धोंगडे आणि विशाल निकमला म्हणाली, "खूप छान झालं, जे तुमच्या मनात होतं ते दिसलं. त्याला सदस्यांनी देखील सहमती दर्शवली. पुढे ती म्हणाली, कोणीही सांगू शकत नाही. तुम्ही एकदा गाणं ऐकून आणि तुम्ही डान्स बसवला. स्टेजवर आग लावली. किरण, अपूर्वा आणि विकास यांचा डान्स सदस्यांसोबत राखीने देखील तितकाच एन्जॉय केला.

आरोह वेलणकर आणि राखीचा डान्स सादर झाल्यानंतर विकास सावंत म्हणाला, एक नंबर झाला. किरण माने म्हणाले, राखी सावंतला लाईव्ह डान्स करताना बघणं म्हणजे काय सांगू. राखी आणि किरण हे बोलताच सगळ्यांना हसू फुटले.

आरोह म्हणाला, आता खरं बाहेर आलं, बिग बॉस जोडी चुकली आहे. पुढे किरण म्हणाले, आरोहने त्याच्या नावाप्रमाणे जो चढता स्वर दाखवला फार सुंदर…राखी एकचं सांगतो तू बिग बॉस मराठी सीझन ४ मध्ये आल्यापासून ते होतंच आहे पण या डान्स नंतर भन्नाट, जबराट, नादखुळा, पाण्यात आग… या शब्दांत- डान्सचे कौतुक किरण माने यांनी केले.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT