मनोरंजन

तेजस्विनी पंडितच्या #BanLipstick मध्ये दडलंय ‘अनुराधा’

अनुराधा कोरवी

मुंबई; पुढारी ऑनलाईन: अभिनेत्री तेजस्विनी पंडितने गेल्या काही दिवसांत आपल्या ओठावरची लिपस्टिक पुसत 'बॅन लिपस्टिक' केल्याचा व्हिडिओ शेअर केला होता. यानंतर सोशल मीडियावर #BanLipstick हा हॅशटॅग चांगलाच ट्रेंड सुरू झाला. या व्हिडिओला तेजस्विनीसोबत अनेक दिग्गज कलाकारांनी पाठिंबा दिला. #BanLipstick मुळे सर्व चाहते गोंधळात पडले होते. सध्या मात्र, यावर पडदा पडला असून तेजस्विनी लवकरच एका वेबसिरीजमधून चाहत्यांच्या भेटीस येत असल्याचा खुलासा केला आहे.

तेजस्विनी पंडितने काही दिवसांत दिवसांपुर्वी आपल्या इंन्स्टाग्रामवर ओठावरची लिपस्टिक पुसत 'बॅन लिपस्टिक' असा एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने 'मी लिपस्टिकचं समर्थन करत नाही. बॅन लिपस्टिक,' असे लिहिले होते. शेअर केलेल्या या व्हिडिओमुळे बॉलिवूड कलाकारांसोबत चाहते देखील गोंधळात पडले होते.

यानंतर तेजस्विनीला अभिनेत्री सोनाली खरे, अदिती सारंगधर, स्मिता गोंदकर, प्रजक्ता माळी यांनी तिला पाठिंबा दिला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच अनेकांनी आपआपल्या प्रतिक्रिया देवून मत व्यक्त केले होते. याच दरम्यान #BanLipstick हा हॅशटॅग सोशल मीडियात ट्रेंड सुरू झाला. व्हिडिओतील लिपस्टिक पुसण्याचा आणि ट्रेंडचा नेमका काय संबंध आहे? असा प्रश्न सर्व चाहत्यांना पडला होता. आता या व्हिडिओमागचं सत्य समोर आलं आहे.

नुकतेच तेजस्विनीने आपल्या इंन्स्टाग्रामवर Kill you soon 'अनुराधा' या वेबसिरीजचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. या फोटोंत Kill you soon वेबसीरिज अनुराधा आणि एक लिपस्टिकसोबत दाखविण्यात आली आहे. या फोंटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'सध्या चर्चेत असलेलं #BanLipstick नक्की काय आहे? त्याचंच उत्तर यात दडलंय. 'अनुराधा' येतेय… लवकरच फक्त 'प्लॅनेट मराठी' अ‍ॅपवर! असे लिहिले आहे.'

यावरून तेजस्विनीचा आगामी अनुराधा ही वेबसिरीज प्लॅनेट मराठीवर लवकरच चाहत्यांच्या भेटीस येत आहे. अनुराधा वेबसिरीजच्या पोस्टरवर या लिपस्टिकचे फोटो पाहायला मिळत आहे. अनुराधा या वेबसिरीज धुरा संजय जाधव यांनी सांभाळली आहे. परंतु, यात कोणकोणते कलाकार असणार आहेत यांची माहिती अजून गुलदस्तात आहे. यामुळे अनुराधा ही वेबसिरीज चाहत्याच्या उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT