ajinkya raut-shivani baokar 
मनोरंजन

शिवानी बावकर-अजिंक्य राऊत यांचे ‘नाते नव्याने’ प्रेमगीत रिलीज

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटच्या एव्हरेस्ट म्युझिकने 'नाते नव्याने' हे 'थोडे अलवारसे, थोडे हळुवारसे…' या मुखडयाचे प्रेमगीत प्रदर्शित केले आहे. एव्हरेस्ट म्युझिकच्या युट्युबवर या व्हिडिओला पाहता येईल. शुक्रवारी, १७ जून २०२२ रोजी या गाण्याचा शुभारंभ झाला. त्या आधी बुधवारी या गाण्याचे ट्रेलर आणि टीझर प्रकाशित झाले.

गाण्याचा व्हिडिओ अगदी चित्रपट चित्रित करावा तशा पद्धतीने चित्रित केला गेला असून तो सुंदर झाला आहे. याप्रसंगी अजिंक्य राऊत, शिवानी बावकर आणि इतर कलाकार तसेच दिग्दर्शक ओमकार एच माने, गायक हृषीकेश रानडे, आनंदी जोशी, संगीत दिग्दर्शक श्रवण दंडवते, गीतकार मुरलीधर राणे आणि इतर तंत्रज्ञ उपस्थित होते.

या गाण्याचे टीझर आणि ट्रेलर बुधवारी दाखल करण्यात आले होते. त्यांना संगीत रसिकांकडून उत्तम प्रतिसाद लाभतो आहे. या टीझर आणि ट्रेलरमध्ये या गाण्याची एकूण पार्श्वभूमी समोर येते. हे गाणे एका प्रेमकथेच्या पार्श्वभूमीवर आकाराला येते. ही प्रेमकथा आहे मायरा आणि जय यांच्यातील. काहीशी गुंतागुंतीची आणि काहीशी गोंधळाच्या परिस्थितीतील ही प्रेमकथा आहे. यातील प्रेमाच्या भावना या नितळ आहेत, पण नायक मात्र नायिकेसमोर त्या मांडायला कचरतो आहे. या गोष्टी स्पष्टपणे समोर येतात आणि त्यामुळे मग गाण्याच्या मुख्य व्हिडिओबद्दलची उत्सुकता अधिक ताणली जाते.

"आम्ही या गाण्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून एक अनोखा असा प्रयोग मराठीमध्ये केला आहे. गाण्याचा हा व्हिडिओ युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून घराघरात जाणार आहे. अशाप्रकारचे अनेक प्रयोग मराठीमध्ये करण्यास आम्ही बांधील आहोत. आमची पूर्ण खात्री आहे की, आमचा हा प्रयोग मराठी प्रेक्षकांना आमच्या याधीच्या प्रयोगांप्रमाणेच भावेल. याआधीच्या आमच्या प्रयोगांना रसिकांना उत्तम प्रतिसाद दिला होता," असे उद्गार एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट एलएलपीचे संजय छाब्रिया यांनी काढले आहेत.

हेदेखील वाचा –

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT