मनोरंजन

यंदाच्या दिवाळीत प्राजक्ता- गौरी लय भारी

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तम अभिनय आणि सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि आई कुठे काय करते (aai kuthe Kai karte) या लोकप्रिय मालिकेतील गौरी म्हणजेच अभिनेत्री गौरी कुलकर्णी या दोघींनी ( प्राजक्ता- गौरी ) आपल्या चाहत्यांना दिवाळीच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

बनारसी साडीत गौरी कुलकर्णी

आई कुठे काय करते फेम अभिनेत्री गौरी कुलकर्णी हिने नुकतेच आपल्या इंन्स्टाग्रामवर दिवाळी निमित्ताने काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत अबोली रंगाच्या बनारसी साडीत गौरी दिसत आहेत. या लूकमध्ये तिचे सौंदर्य आणखी खूलून दिसत आहे. याशिवाय ग्रीन आणि सिल्वर रंगाच्या ब्लाउजसोबत साजेशीर असे दागिने तिने परिधान केले आहेत.

शेअर केलेल्या एका व्हिडिओत ती एका झाडाच्या मागून पुढे येताना तर तिच्या हातात पिवळ्या रंगाचे फुलदेखील दिसत आहे. गौरीने बंगल्याच्या पायरीवर आणि झाडाखाली उभारून पोझ दिली आहे. गौरीने फोटोच्या कॅप्शनमध्ये '#SareeWaliDiwali with @karagiri_ethnic ??'असे लिहिले आहे. गौरीने आपल्या चाहत्यांना साडीतील फोटो शेअर करून यंदाच्या दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

निळ्या-गुलाबी रंगात प्राजक्ता माळी

उत्तम अभिनय आणि सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकतेच तिने चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत काही हटके फोटो शेअर केले आहेत. या फोटोत प्राजक्ता निळ्या आणि गुलाबी रंगाची साडीत सुंदर दिसत आहे. यावेळी प्राजक्ता घराच्या दारात हात जोडून बसलेली असून तिच्या समोर फुलाची रांगोळी सजलेली दिसत आहे. या फोटोसोबत तिने सर्व चाहत्यांना हात जुडून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा फोटो तिने वसुबारस या दिवाळीच्या दिवशी शेअर केला आहे.

या फोटोला प्राजक्ताने भलीमोठी कॅप्शन लिहिले आहे. त्यात तिने 'सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा…. !!!!!.

* वसुबारस !*
गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता,
प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास लाभो !
* धनत्रयोदशी !*
धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत !
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो !
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो !
*नरकचतुर्दशी !*
सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा !
अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ आपल्याला लाभो !!
आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो !
आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !!
*लक्ष्मीपूजन !*
लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा !
नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त होवो !
लक्ष्मीपूजनाचे भाग्य आपल्याला नेहमीच लाभो !
*पाडवा अर्थात बलिप्रतिपदा !*
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव गोडवा यावा ! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो !
थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत राहो !
*भाऊबीज !*
जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे !
भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे !
ही दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास,
आनंदाची आणि भरभराटीची जावो..
#आलीदिवाळी #prajakttamali @? ' असे लिहिले आहे.

हे दोन्ही फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांकडून कॉमेंन्टसचा पाऊस पडत आहे. यात एकाने 'प्राजक्ता तू आणि रांगोळी खुपच सुरेख- सुंदर दिसतेय. तर दुसऱ्या एकाने दोघींना दिवाळीच्या खुपसाऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत '. याशिवाय आणखी एकाने हास्याचा आणि प्रेमाचा ईमोजी शेअर करत 'लयभारी' म्हटले आहे.

प्राजक्ता माळी नेहमी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून हटके फोटो शेअर करत असते. तर आई कुठे काय करते (aai kuthe Kai karte) या मालिकेत गौरीची भूमिका गौरी कुलकर्णीने साकारली आहे. ही मालिका चाहत्यांच्या घराघरात पोहोचली आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT