मनोरंजन

अभिनेत्री गौरी कुलकर्णी साकारणार अबोली, नव्या मालिकेतून भेटीला

स्वालिया न. शिकलगार

नवी मालिका अबोली प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. अबोली नावाच्या मुलीच्या संघर्षाची. अभिनेत्री गौरी कुलकर्णी ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. गौरी कुलकर्णी ही भूमिका साकारण्यासाठी खुपच उत्सुक आहे. मालिकेच्या शीर्षकाप्रमाणेच ही गोष्ट आहे.

या भूमिकेविषयी सांगताना गौरी म्हणाली, मालिकेच्या निमित्ताने मी पहिल्यांदाच स्टार प्रवाहसोबत काम करतेय याचा आनंद आहे. ही अतिशय साधी मुलगी आहे. नावाप्रमाणेच अबोल, कमी बोलणारी. तिचं असं वेगळं जग आहे ज्यात ती रमते. खरंतरं, तिला तिचं म्हणणं मांडायचं असतं मात्र तिला ते मांडू दिलं जात नाही.

माझ्यासाठी ही अतिशय आव्हानात्मक भूमिका आहे. कारण मला बोलायला खूप आवडतं. सेटवर माझी अखंड बडबड सुरु असते. मात्र मितभाषी आहे. त्यामुळे ही व्यक्तीरेखा साकारणं माझ्यासाठी नवं आव्हान आहे.

आमची टीम खूपच छान आहे. सचित पाटील, प्रतिक्षा लोणकर, मौसमी तोंडवळकर, शर्मिष्ठा राऊत, संदेश जाधव, अपर्णा अपराजित, अंगद म्हस्कर, दीप्ती लेले अशी दमदार कलाकारांची फौज या मालिकेत आहे. त्यामुळे प्रेक्षकांनाही ही मालिका पहाताना भरभरुन आनंद मिळेल याची खात्री आहे. त्यासाठी पाहायला विसरु नका नवी मालिका मंगळवार २३ नोव्हेंबरपासून रात्री १०.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT