director girish malik 
Latest

संजय दत्तचे दिग्दर्शक गिरीश मलिक यांच्या मुलाचा पाचव्या मजल्यावरून पडून मृत्यू

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

संजय दत्त स्टारर 'तोरबाज' चित्रपटाचे दिग्दर्शक गिरीश मलिक यांच्या मुलाचा मृत्यू झाला. अंधेरीतील गिरीश मलिक यांच्या राहत्या इमारतीच्या ५ व्या मजल्यावरून पडून त्यांच्या १७ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. त्याने स्वत: उडी मारली की आणखी काही घडले हे सध्या तरी कळू शकलेले नाही. होळीच्या दिवशी ही घटना घडली. एकीकडे लोक होळीच्या सेलिब्रेशनमध्ये बिझी असताना दुसरीकडे मलिक यांच्या घरी एक अज्ञात घटना घडली. मलिक यांच्या मुलाच्या आकस्मिक निधनाने कुटुंबावर दु:ख कोसळले आहे.

मलिक २०२० मध्ये आलेल्या 'तोरबाज' चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी ते प्रसिद्ध आहेत. या चित्रपटात संजय दत्तशिवाय राहुल देव आणि नर्गिस फाखरी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला.

तोरबाजमधील मलिकचा भागीदार पुनीत सिंग याने या दु:खद बातमीची पुष्टी केली. पुनीतने सांगितले की, 'श्री मलिक यांच्या मुलाचे निधन झाले आहे, पण नेमके काय झाले ते मी सध्या सांगू शकत नाही. आम्ही बोलण्याच्या स्थितीत नाही.

तोरबाज चित्रपटाचे निर्माते राहुल मित्रा यांनी एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार, संजय दत्त आणि मला मलिक यांच्या मुलाच्या मृत्यूनंतर धक्का बसला आहे. तो म्हणाला, "मी दुर्दैवी घटनेबद्दल जाणून घेण्यास उत्सुक नाही आणि नुकतेच संजूला कळवले आहे, जो खूप दुःखी आहे. आम्हाला शब्दांपलीकडचा धक्का बसला आहे.

तोरबाज बनवताना मी मलिक यांच्या मुलाला दोनदा भेटलो होतो, असे ते म्हणाले. तो खूप हुशार मुलगा होता. हे कधीही न भरून येणारे नुकसान भरून काढण्याची ईश्वर गिरीश आणि संपूर्ण कुटुंबाला शक्ती देवो.

गिरीश मलिक हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. 'तोरबाज' व्यतिरिक्त 'जल' सारखा सुपरहिट चित्रपटही त्यांनी केला. या चित्रपटात पूरब कोहली आणि कीर्ती कुल्हारी यांनी भूमिका साकारल्या होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT