श्रुती हासन  
Latest

Shruti Haasan : ‘तुझी साईज काय आहे?’ प्रश्नावर भडकली श्रुती

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ सिनेसृष्टी आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती हासन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. श्रुती अभिनयासोबतच गायनातही पारंगत आहे. टॉलिवूडमधील सर्वात मोठ्या अभिनेत्रींपैकी एक असलेली श्रुती हासन (Shruti Haasan) बॉलिवूडमध्ये तिची फारशी जादू दाखवण्यात अयशस्वी ठरली. तिचे फॅन फॉलोइंगदेखील खूप जास्त आहे. अशा परिस्थितीत, सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर, अभिनेत्रीचे फोटो आणि व्हिडिओ पाहताच व्हायरल होताहेत. तिच्या चाहत्यांकडून तिला नेहमीच कमेंट मिळत असतात. तर कधी ट्रोलर्सकडून तिच्यावर टीकाही होते. आताही ट्रोलर्सनी तिला असा काही प्रश्न विचारला की, श्रुती संतापली. तिने ट्रोलर्सची चांगलीच शाळा घेऊन त्यांची बोलती बंद केलीय. (Shruti Haasan)

तमिळ सुपरस्टार कमल हासनची मुलगी श्रुती हासन आज साऊथ सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे. तिने टॉलिवूडमध्ये अनेक मोठे आणि ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. परंतु २००९ साली 'लक' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या या अभिनेत्रीचे नशीब चमकू शकले नाही. जरी तिने बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपट केले असले तरी तिला आपले स्थान बळकट करायला फारसे जमले नाही.
श्रुती हासन तिच्या अभिनयासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील चर्चेत असते. त्याने आपल्या नात्याबद्दल सार्वजनिकपणे सांगितले आहे. ती शंतनू हजारिकासोबत रिलेशनशीपमध्ये आहे. त्याच्यासोबत ती अनेकदा तिचे फोटो शेअर करत असते. मात्र, लग्नाच्या प्रश्नावर तिने तूर्त मौन बाळगले आहे.

ट्रोलरने बॉडी शेमिंगचा प्रयत्न केला

वास्तविक, एका युजरने अभिनेत्रीला तिच्या ओठांवर प्रश्न विचारला होता. त्या व्यक्तीने श्रुतीला विचारले तुझ्या ओठांचा आकार किती आहे? असा प्रश्न करून त्या व्यक्तीने अभिनेत्रीला बॉडी शेम करण्याचा प्रयत्न केला. मात्र क्षणाचाही विलंब न लावता श्रुतीने त्याचा चांगलाच धडा घेतला. श्रुतीने अतिशय मस्त पद्धतीने उत्तर दिले आणि लिहिले की ओठांचा आकार किती आहे? जे वाचून त्या व्यक्तीने बोलणे बंद केले.

अभिनेत्री शेवटची तमिळ चित्रपट 'लबम'मध्ये दिसली होती. याशिवाय अभिनेत्री 'बेस्ट सेलर' या वेब सीरिजमध्येही दिसली होती. आता अनेक चित्रपट तिच्या झोळीमध्ये आहेत, ज्यात तेलुगू चित्रपट एनबीके १०७, वाल्टेयर वीरय्या और सुपरस्टार प्रभाससोबत 'सालार' लवकरच येत आहे.

हेदेखील वाचा-

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT