बेळगाव : अलमट्टीतील पाण्याच्या विसर्गाला तिरंग्याचा साज (व्हिडिओ) | पुढारी

बेळगाव : अलमट्टीतील पाण्याच्या विसर्गाला तिरंग्याचा साज (व्हिडिओ)

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा; अलमट्टी धरणातून गेल्या तीन दिवसांपासून सव्वा दोन लाख क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. विसर्ग होत असणाऱ्या या पाण्याला शनिवारी सायंकाळी विद्युत रोषणाईतून तिरंग्याच्या तीन रंगांचा साज चढवण्यात आला आहे.

सोमवारी स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना शनिवारपासूनच हर घर तिरंगा मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून अलमट्टी धरणाच्या दरवाजांतून बाहेर पडणार्‍या पाण्याला विद्युत दिव्यांच्या माध्यमातून केसरी, पांढरा आणि हिरवा अशा तीन रंगाची प्रकाशयोजना राबवून तिरंगा साधण्यात आला आहे. १२३ टीएमसी साठवण क्षमता असलेल्या या धरणातून सव्वा दोन लाख क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे सांगली, कोल्हापूरचा पुराचा धोका टळला आहे.

हेही वाचा

Back to top button