श्रीगोंदा : दहापट व्याज देऊनही तगादा !

file photo
file photo

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा : येथील व्यावसायिक शिवराम वहाडणे यांच्या आत्महत्येनंतर खासगी सावकारकीच्या कर्जाचा किती कळस झाला होता, याचा उलगडा पोलिस तपासात होत आहे. व्याजाची दहापट रक्कम देऊनही सावकार पैशाचा तगादा लावत असल्यानेच वहाडणे यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. श्रीगोंदा येथील वडापाव व्यावसायिक शिवराम वहाडणे यांनी 9 ऑगस्ट रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

सावकारी कर्जातून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पंधरा खासगी सावकारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यातील सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
शिवराम वहाडणे यांनी मोबाईल व वहीमध्ये सावकार व त्यांच्याकडून घेतलेले कर्ज , परत केलेली रक्कम याबाबत तपशील लिहिला आहे. व्याजाची दहापट रक्कम देऊनही सावकार आणखी पैशाची मागणी करत आहेत रोज हॉटेल मध्ये येऊन पैशाची मागणी करत गल्ल्यातील पैसे घेऊन जात असल्याचे त्यांनी मृत्यूपूर्व चिठ्ठीत लिहून ठेवले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news