पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री मेघा गुप्ता ( megha gupta ) यांचा फॅन या चित्रपट खूपच गाजला. टीव्ही इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री मेघा गुप्ता नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असून ती आपले हॉट फोटोज शेअर करत असते, सध्या मेघाने सर्व मर्यादा पार करत बाथरुमधील शोवरखाली आंघोळ करतानाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंने सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे.
मेघा गुप्ताने ( megha gupta ) नुकतेच आपल्या इंन्स्टाग्रामवर शॉवरखाली थंड पाण्याने आंघोळ करतानाचे काही फोटोज शेअर केले आहेत. या फोटोत ती निळ्या रंगाच्या बिकिनीत पाठमोरी उभी असल्याचे दिसत आहे. या फोटोत मेघा खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. याशिवाय तिने बोल्डनेसच्या मर्यादा पार करत चाहत्यांना घायाळ केले आहे.
हे फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं- 'थंड पाण्याचे फवारे, थंडी खोल श्वास घेण्यासाठी प्रेरित करतात. संपूर्ण शरीरात CO2 चं स्तर कमी करतात. त्यामुळे तुम्हाला तुमचे लक्ष केंद्रीत होण्यास मदत मिळते. या प्रकारे थंड पाण्याचे फवारे तुम्हाला संपूर्ण दिवसासाठी तयार करते आणि अधिक इम्यूनिटी बूस्ट करते. तर हा नार्मल शॉवर नसून थंड शॉवर असल्याचे देखील तिने सांगितले आहे.' यासोबत तिने थंड शॉवरखाली अंघोळ करण्याचे काही फायदे सांगितले आहेत.
हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यासह अनेक बॉलिवूड स्टार्संनी आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात एका युजर्सने 'अभिनेत्रीच्या लूकने घायाळ केलं'. तर दुसऱ्या एका युजर्सने 'रात्रीचा झोप उडाली' आहे असे म्हटले आहे. याशिवाय काही चाहत्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत. याआधीही मेघाने बर्फाने भरलेल्या बाथमध्ये बसलेली असतानाचा फोटो शेअर केला होता.
मेघा गुप्ताने 'सीआईडी', 'कुमकुम', 'मैं तेरी परछाई हूं', 'यहां मैं घर-घर खेली' आणि 'सावधान इंडिया' यासारख्या गाजलेल्या मालिकेत काम केले आहे. याशिवाय ती बॉलिवुड अभिनेता शाहरुख खानसोबत 'फॅन' या चित्रपटात दिसली आहे.
हेही वाचलंत का?