

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : नुकत्याच संपलेल्या फेब्रुवारी महिन्यात १ लाख ३३ हजार २६ कोटी रुपयांची कर वसुली झाली असल्याची माहिती अर्थ मंत्रालयाकडून मंगळवारी देण्यात आली. जीएसटी कर (GST) प्रणाली लागू झाल्यापासून आतापर्यंत पाचव्यांदा करवसुली १.३० लाख कोटी रुपयांच्या पुढे गेलेली आहे.
फेब्रुवारीमध्ये केंद्रीय करांच्या रुपात सरकारला २४ हजार ४३५ कोटी रुपये प्राप्त झाले. स्टेट जीएसटीच्या (GST) माध्यमातून ३० हजार ७७९ कोटी रुपये तर आय-जीएसटी च्या माध्यमातून ६७ हजार ४७१ कोटी रुपये (यात ३३ हजार ८३७ कोटी रुपयांच्या आयात कराचा समावेश आहे.) प्राप्त झाले. उपकरांद्वारे १० हजार ३४० कोटी रुपये मिळाले आहेत. गतवर्षीच्या फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत यंदाच्या फेब्रुवारीमध्ये जीएसटीमध्ये झालेली वाढ १८ टक्क्याने जास्त आहे. फेब्रुवारी २०२० च्या तुलनेत ही वाढ २६ टक्क्याने जास्त आहे.
हेही वाचलंत का ?
पहा व्हिडिओ