Russian invasion of Ukraine : रशियाचे ५,७१० सैनिक ठार, युक्रेनचा दावा

Russian invasion of Ukraine : रशियाचे ५,७१० सैनिक ठार, युक्रेनचा दावा
Published on
Updated on

कीव्ह; पुढारी ऑनलाईन

Russian invasion of Ukraine : रशियाच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले जात असून गेल्या पाच दिवसांच्या लढाईत रशियाचे ५,७१० सैनिक मारल्याचा दावा युक्रेनियन सैन्याने केला आहे. फेसबुकवर पोस्ट केलेल्या माहितीनुसार, युक्रेनच्या सशस्त्र दलाने म्हटले की युक्रेनियन सैन्याने २०० हून अधिक रशियन सैनिकांना ताब्यात घेतले आहे. १९८ रशियन रणगाडे, २९ विमाने, ८४६ शस्त्रसाठा वाहने आणि २९ हेलिकॉप्टर नष्ट केल्याचा दावाही युक्रेनकडून करण्यात आला आहे.

दरम्यान, कीव्ह नंतर खार्किव्ह शहरावर रशियाचे हल्ले सुरु आहेत. येथे मोठी जीवितहानी झाल्याचे वृत्त आहे. रशियाच्या हल्ल्यात नागरिकांचे मृत्यू होत असून हा एक युद्ध गुन्हा असल्याचे युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटले आहे. खार्किव्ह शहरातील हल्ल्यात ९ जण ठार झाले आहेत. यात तीन मुलांचा समावेश आहे.

युक्रेनचे ७० हून अधिक सैनिक ठार

रशियाने रॉकेटसह क्रुझ क्षेपणास्‍त्रांच्‍या केलेल्‍या मार्‍यामुळे युक्रेनमध्‍ये हाहाकार उडाला आहे. (Russia-Ukraine War ) राजधानी कीव्‍ह शहराच्‍या दिशेने रशियन सैन्‍याची आगेकूच करत ६४ किलोमीटर परिसर व्‍यापल्‍याचे सॅटेलाईट फोटोमधून स्‍पष्‍ट झाले आहे. खार्किव्‍ह आणि कीव्‍ह या शहरांच्‍या मध्‍यभागी असलेल्‍या युक्रेनच्‍या लष्‍करी छावणीवर रशियाने हल्‍ला केला. यामध्‍ये ७० हून अधिक युक्रेनच्‍या सैनिक ठार झाले आहेत. दरम्‍यान, रशिया-युक्रेन युद्‍धासंदर्भात संयुक्‍त राष्‍ट्र मानवाधिकार परिषदेच्‍या आपत्तकालीन बैठकीत भारतासह अन्‍य १३ देशांनी भाग घेतला नाही.

 Russian invasion of Ukraine : युक्रेनमध्‍ये बॉम्‍बहल्‍ल्‍यात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्‍यू

युक्रेनमध्‍ये आज रशियाने केलेल्‍या बॉम्‍बहल्‍ल्‍यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्‍यू झाला आहे, अशी माहिती परराष्‍ट्र मंत्रालयाने दिली. परराष्‍ट्र मंत्रालयाने ट्‍विटमध्‍ये म्‍हटलं आहे की, आज सकाळी खार्किव्‍हमध्‍ये झालेल्‍या बॉम्‍बहल्‍यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्‍यू आहे. त्‍याच्‍या कुटुंबीयांच्‍या संपर्कात आम्‍ही आहोत. आम्‍ही रशिया आणि युक्रेनमधील भारतीय राजदुतांच्‍या संपर्कात आहोत. येथे अडकलेल्‍या विद्यार्थ्यांना सुखरुप मायदेशी आणण्‍यासाठी आमचे प्रयत्‍न सुरु असल्‍याचेही परराष्‍ट्र व्‍यवहार मंत्रालयाने स्‍पष्‍ट केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news