पुढारी ऑनलाईन डेस्क : स्विमिंग पुलमध्ये सहा वर्षांच्या बालकासमोर खुल्लम खुल्ला रंगेलपणा करणार्या ( Rajasthan Swimming pool scandal ) राजस्थानमधील डीएसपी हीरलाल सैनीसह महिला कॉन्स्टेबलला अखेर बडतर्फ करण्यात आले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली.
राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील बेवार येथे डीएसपी हीरालाल सैनी कार्यरत होता. अजमेर येथील पुष्करमधील एका रिसार्टमधील जलतरण तलावात महिला कॉन्स्टेबलसोबत अश्लील कृत्य करत असतानाचा त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यावेळी येथे महिला कॉन्स्टेबलचा सहा वर्षांचा मुलगा देखील होता. ( Rajasthan Swimming pool scandal ) हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने राजस्थान पोलिस दलात खळबळ माजली होती. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर महिला कॉन्स्टेबलचा पतीने तक्रार दाखल केली. डीएसपी हीरालाल सैनी याला ९ सप्टेंबर तर महिला कॉन्स्टेबलला १२ सप्टेंबरला अटक करण्यात आले हाेते.
( Rajasthan Swimming pool scandal ) महिला कॉन्स्टेबलने १३ जुलै २०२१ रोजी जलतरण तलावातील काही व्हिडिओ आपल्या व्हॉट्स ॲपवर स्टेटस ठेवले होते. यात महिलेचे ६ वर्षाचा मुलगाही हाेता. नंतर काही वेळात २ मिनिट ३८ सेकंदाचा दुसरा व्हिडिओ समोर आला हाेता. डीएसपी हीरालाल सैनी आणि महिला कॉन्स्टेबलसह तिचा ६ वर्षाचा मुलगाही हाेता. या प्रकरणाची राज्य बाल संरक्षण आयोगाने गंभीर दखल घेतली हाेती. आयोगाच्या अध्यक्षा संगीता बेनीवाल यांनी नागौर पोलिस अधीक्षकांकडे तीन दिवसांत अहवाल मागितला होता.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर डीजीपी एमएल लाठर यांनी ८ सप्टेंबर रोजी हिरालाल सैनी याला निलंबित केले होते. डीएसपी आणि महिला कॉन्स्टेबलविरोधात विभागीय चौकशी झाली. याचा अहवाल मुख्यमंत्री कार्यालयास सादर करण्यात आला. यानंतर डीएसपी हीरलाल सैनीसह महिला कॉन्स्टेबलला बडतर्फ करण्याचा आदेश मुख्यमंत्री कार्यालयाने दिला असल्याचे सूत्रांनी सांगितले.