राजगुरूनगर ; पुढारी वृत्तसेवा : पुणे-नाशिक महामार्गावर पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खेड घाट बाह्यवळणावर (मंगळवार) मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास खेड घाटात दरीत मोटार कोसळली. वाहन चालक संजय मधुकर खैरनार (वय ४९ ) हे या अपघातात जखमी झाले. खैरनार यांचा ताबा सुटल्याने खेड घाटात दरीत मोटार कोसळली.
खैरनार हे नाशिक कडून पुण्याकडे जात होते. यावेळी त्यांचा मोटारीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. सुमारे दीडशे फूट खोल दरीत कोसळल्याने खैरनार गंभीर जखमी झाले आहेत. खेड पोलिसांना या अपघाताची माहिती मिळताच पोलिस अंमलदार स्वप्नील गाढवे संतोष घोलप, भोईर , जाधव , अर्जुन गोडसे , होमगार्ड – लोखंडे , बाळा भांबुरे हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
दरीतून खैरनार यांना बाहेर काढण्यात आले. योगेश शिंदे यांच्या रुग्णवाहेकेमधून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र या वाहनातून अजून कितीजण प्रवास करत होते व अजून कोण जखमी झाले याची माहिती उशिरा पर्यंत मिळू शकली नाही.