नागपूर, पुढारी ऑनलाईन
नागपूरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला होणार असल्याच्या शक्यतेवरून सुरक्षा एजन्सीज सतर्क झाल्या आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शुक्रवारी सांगितलं की, दहशतवादी संघटना शहरात मोठा हल्ला करण्याच्या योजनेवर काम करत आहेत. यामध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचं नाव समोर आलेलं आहे. (Sangh office)
पोलीस आयुक्तांनी सांगितलं की, "मागील काही दिवसांपूर्वी जैश-ए-मोहम्मद संघटनेच्या काही दहशतवाद्यांनी नागपुरात काही ठिकाणांची माहिती घेतली आहे. आम्ही बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे. याचा तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे", अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार संशयितांनी नागपुरमधील संघाच्या कार्यालयासहीत (Sangh office) अनेक प्रसिद्ध ठिकाणांचे फोटो घेतलेले आहेत. त्याचा व्हिडिओदेखील त्यांनी तयार केला आहे. त्यामुळे नागपुरात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आलेली आहे. चौकांचौकांमध्ये पोलीस तैनात करण्यात आले आहेत. नाकाबंदी करण्यात आली आहे. बाहेरून येणाऱ्या व्यक्तीची कडक तपासणी करण्यात येत आहे.
पोलीस आयुक्तांनी सांगितले की, "दहशतवादी कारवाया होणार असल्याची शक्यता संपल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. शहरातील सर्व महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात आली आहे. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात संघाच्या नेत्यांवर दहशहतवादी हल्ले करण्याची प्रयत्नासंदर्भात माहिती समोर आली होती.
हे वाचलंत का?