राष्ट्रीय

पूरग्रस्तांना केंद्राकडून सर्वोतपरी मदत : आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार

नंदू लटके

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्रात आलेल्या पूरामुळे निर्माण झालेल्या स्थितीवर केंद्र सरकार तसेच पंतप्रधान स्वत: लक्ष ठेवून आहेत. पूरग्रस्‍तांना केंद्राकडून सर्वोतपरी मदत केली जाईल, अशी ग्‍वाही केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सोमवारी दिली.  संसर्गजन्य रोगांबाबत राज्य सरकारसोबत चर्चा करण्यात आल्‍याचेही डॉ. भारती पवार त्यांनी सांगितले.

अधिक वाचा 

राज्यातील महापुराच्या स्थितीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालय लक्ष ठेवून आहे. राज्याला आवश्यक ती मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापुरानंतर पाण्यामुळे होणाऱ्या संसर्गजन्य रोगांबाबत राज्य सरकारसोबत चर्चा करण्यात आली आहे. या संदर्भात केंद्र सरकार सर्व प्रकारची मदत करण्याकरिता कटिबद्ध आहे, असेही डॉ.पवार यांनी सांगितले.

अधिक वाचा

दरम्यान, त्यांनी नवीन महाराष्ट्र सदनाला भेट देवून आगीच्या घटनेसंबंधी पाहणी केली. राज्यपालांच्या कक्षाला आग लागली होती. अलार्म यंत्रणा वेळीच सुरू झाल्याने मोठी हानी टळली. महाराष्ट्र सदनाच्या इमारतीची चौकशी करीत वेळीच 'फायर ऑडिट' करण्याची मागणीही त्‍यांनी केली.

सरकारच्या मदतीवर समाधानी नाही-श्रीनिवास पाटील

राज्यातील पूरपरिस्थिती ही महाभयंकर आहे. अशाच प्रकारची परिस्थिती सातारा जिल्‍ह्याचीही आहे.पंरतु,सर्वप्रथम पूरग्रस्तांना अन्नाची व्यवस्था करणे हे आमचे प्राथमिक कर्तव्य आहे. राज्य सरकार मदत करीत आहे.पंरतु,राज्य सरकारच्या मदतीवर समाधानी नाही, अशी प्रतिक्रया खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केली. सर्वांना लवकरच मदत मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी या वेळी व्यक्त केली.

हेही वाचलं का ?

व्‍हिडीओ पाहा : पूरग्रस्तांना बोटींमार्फत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा

SCROLL FOR NEXT