रायगड: सुयोग आंग्रे : तळीये दरड दुर्घटना : महाड तालुक्यातील तळीये गाव 22 जुलैला अतिवृष्टीमुळे दरड कोसळून उद्ध्वस्त झाले होते. कालपर्यंत दरडीच्या ढिगार्यातून 53 मृतदेह बाहेर काढण्यात आले होते.
मात्र आज चौथ्या दिवशी बचावकार्य थांबविण्यात आले असून, बेपत्ता असलेल्या 31 जणांना मृत घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे दरड दुर्घटनेतील मृतांचा आकडा 84 वर पोहोचला आहे.
या दुर्घटनेत केवळ 5 जण जखमी अवस्थेत सापडले आहेत. तर बेपत्ता असलेल्या 31 जणांचा तीन दिवसांनंतरही शोध सुरुच होता. मात्र आज हे बचावकार्य थांबविण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला. दरडीखालून कोणी जिवंत आढळून येईल, ही आशाही मावळल्याने हा निर्णय घेण्यात आला.
तळीये गावावर गुरुवारी (22 जुलै) दरड कोसळली आणि होत्याचे नव्हते झाले. घरंच्या घरं दरडीखाली दबली जाऊन निष्पांपाचे जीव गेले. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या तळीयेमध्ये आता फक्त उद्ध्वस्त झालेले संसार, चिखल, मृत्यूचा तांडव, आक्रोश सुरु आहे.
रविवारपर्यंत दरडीच्या ढिगार्याखालून 53 मृतदेह बाहेर काढण्यात आले होते, तर 5 जण जखमी अवस्थेत सापडले आहेत.
या दुर्घटनेत 31 जण बेपत्ता होते, त्यांना आज मृत घोषित करण्यात आले आहे.
एनडीआरएफ, एसडीआरएफ, टीडीआरएफचे मत आणि बेपत्ता झालेल्या लोकांच्या नातेवाईकांच्या भावना जाणून घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
तळीये दुर्घटनेत केवळ 5 जण जखमी अवस्थेत सापडले असून, यामध्ये स्वप्नील धोंडीराम शिरावले (वय 40), संगीता संजय कोंढाळकर (50), स्वाती संजय कोंढाळकर (25), हंसाबाई ऊर्फ रेश्मा चंद्रकांत कोंढाळकर (46), अनिल सखाराम गंगावणे (35) यांचा समावेश आहे.
तळीये येथील दरडीखालून आतापर्यंत 42 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्यामुळे या गावात आक्रोश आणि आक्रोश सुरु आहे. मृतांमध्ये 1) बाळू महादू यादव-75, 2) कृष्णाबाई बाळू यादव-70, 3) गुणाची बाळू यादव-30, 4) दिपाली गुणाजी यादव-30, 5) अवनी सुनील शिरावले-5, 6) पार्थ सुनील शिरावले-1, 7) बाळकृष्ण तात्याबा कोंढाळकर-45, 8) लक्ष्मण रावजी यादव-70, 9) श्याम श्रीपत यादव-75, 10) देवेंद्र श्याम यादव-38, 11) दिपाली देवेंद्र यादव-35, 12) अलका भीमसेन शिरावले-50, 13) आयुष भीमसेन शिरावले-12, 14) दिपाली भीमसेन शिरावले-17, 15) देवकाबाई बापू सपकाळ-72, 16) भरत तुळशीराम शिरावले-25, 17) निकिता भरत शिरावले-23, 18) केशव बाबुराव पांडे-70, 19) रेशमा विजय पांडे-28, 20) मनाली विजय पांडे-7, 21) उषा पांडुरंग कोंढाळकर-80, 22) संजय बापू कोंढाळकर-55, 23) अजित ज्ञानेश्वर कोंडाळकर-22, 24) अभिजीत ज्ञानेश्वर कोंडाळकर-20, 25) मंजुळा गणपत गायकवाड -70, 26) प्रविण किसन मालुसरे-25, 27) अनिता उर्फ मंदा संपत पोळ-50, 28) ऋषिकेश चंद्रकांत कोंढाळकर-25, 29) अश्विनी अमोल कोंढाळकर-25, 30) संकेत दत्ताराम जाधव-25, 31) सानिका संकेत जाधव-22, 32) द्रोपदी गणपत धुमाळ-70, 33) धोंडीराम लक्ष्मण शेडगे-65, 34) दैवत शंकर कोंडाळकर-65, 35) गणपत केदारी जाधव-85, 36) इशांत देवेंद्र यादव-10, 37) विघ्नेश विजय पांडे-5 महिने, 38) करण देवेंद्र यादव-8, 39) लिलाबाई यशवंत कोंढाळकर-65, 40) किसन काशीराम मालुसरे-55, 41) बाबू धोंडु सकपाळ-75, 42) संपत कुशाबा पोळ-55, 43) विमल तुळशीराम शिरावळे-65, 44) इंदीराबाई शांताराम शिरावळे-62, 45)अंजीराबाई बापू कोंढाळकर-62, 46) नर्मदाबाई तुकाराम कोंढाळकर-75, 47) सुगंधा ज्ञानेश्वर कोंढाळकर-37, 48) शकुंतला रामचंद्र कोंढाळकर-70, 49) सुधाकर रामचंद्र कोंढाळकर-44, 50) विजय बाळकृष्ण साळुंखे-25, 51) निराबाई शिवराम कोंढाळकर-65, 52) सुनंदा विठ्ठल जाधव-50, 53) भाविका नारायण निकम-15 यांचा समावेश आहे.
1) प्रविणा सुनिल शिरावले-30
2) आशा बाळकृष्ण कोंढाळकर-40
3) राहुल बाळकृष्ण कोंढाळकर-23
4) पुष्पा लक्ष्मण यादव-65
5) तुळशीराम बाबू शिरावले-70
6) सुरज तुळशीराम शिरावले- 27
7) हौसाबाई केशव पांडे-65
8) शांताराम गंगाराम शिरावले-75
9) ज्ञानेश्वर तुकाराम कोंढाळकर-55
10) मधुकर तुकाराम कोंढाळकर-54
11) तानुबाई रामचंद्र साळंखे- 75
12) यशवंत रामचंद्र कोंढाळकर-65
13) गणपत तानाजी गायकवाड-75
14) शिवराम सिताराम कोंढाळकर-70
15) शांताबाई काशीराम मालुसरे-75
16) कांता किसन मालुसरे-50
17) विद्या किसन मालुसरे-22
18) चंद्रकांत बापू कोंढाळकर-50
19) तन्वी चंद्रकांत कोंढाळकर -12
20) स्वरूपा चंद्रकांत कोंढाळकर- 10
21) पांडुरंग तात्याबा कोंढाळकर-60
22) काजल पांडुरंग कोंढाळकर-22
23) सान्वी संकेत जाधव-1
24) रामचंद्र बाळकृष्ण जाधव-70
25) सुशिला रामचंद्र जाधव-65
26) रमेश रामचंद्र जाधव-40
27) प्रदीप रामचंद्र जाधव-29
28) रविंद्र रामचंद्र जाधव-26
29) राधाबाई देवजी जाधव-80
30) निराबाई हनुमंत कदम-55
31) उर्मिला धोंडीराम शेडगे-60
हे ही वाचलं का?