राष्ट्रीय

आमची थडगी बांधा, पण जागा सोडणार नाही; राकेश टिकैत यांचा इशारा

backup backup

मुजफ्फरनगर: पुढारी ऑनलाईन : दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन आम्ही सुरूच ठेवू, भलेही आमची थडगी बांधा पण आम्ही आंदोलनााची जागा सोडणार नाही, असा इशारा भारतीय किसान युनियन चे नेते राकेश टिकैत यांनी दिला. मुजफ्फरनगर येथे झालेल्या महापंचायतीत त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

मुजफ्फरनगर च्या जीआययसी ग्राऊंडवर झालेल्या महापंचायतीला मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.

यावेळी टिकैत यांनी 'अल्ला हू अकबर' आणि हर हर महादेव अशा घोषणा दिल्या. या घोषणा आधीह दिल्या जात होत्या आणि आत्ताही दिल्या जातील.

हे लोक लोकांना विभागायचे काम करत आहेत. यांना आम्हाला रोखायचे आहे. उत्तरप्रदेशची जमीन दंगल करणाऱ्यांची नाही हे आम्ही दाखवून देऊ.

राकेश टिकैत इशारा देताना म्हणाले, ' आम्ही आज संकल्प करतोय की, दिल्लीच्या सीमांवर आमचे आंदोलनस्थळ काही केले तरी आम्ही सोडणार नाही.

भलेही आमचे तेथे थडगे बांधा. गरज पडली तर आम्ही आमचा जीव देऊ पण आंदोलनस्थळ सोडणार नाही.

सरकार जर अडून बसले तर आम्हीही आंदोलन चालवायला सक्षम आहोत.

जोपर्यंत ते आमची भूमिका मान्य करत नाहीत तोपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहील.

देशाच्या स्वातंत्र्याची लढाई ९० वर्षे सुरू राहिली. हे आंदोलन किती वर्षे सुरू राहील हे आम्हाला माहीत नाही.

आमच्यापुढे आता हे युपी मिशन नाही. भारत मिशन आहे. आम्हाला भारताचे संविधान वाचवायचे आहे.

मोदी आणि योगी सरकार वीज, एअरपोर्ट सगळे विकत आहे.'

टिकैत यांनी दिला होता इशारा

तीन शेती कायद्यांच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चाच्या महापंचायतीला येणाऱ्या शेतकऱ्यांना अडवाल तर फोडून काढू असा इशारा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी दिला आहे. 'महापंचायतीसाठी किती लोक येतील, हे सांगणं शक्य नाही. मात्र, मोठ्या संख्येनं लोक पोहोचतील एवढं नक्की. शेतकऱ्यांना महापंचायतीपर्यंत पोहोचण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT