नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : Pegasus : देशातील पत्रकार, मंत्र्यांचा फोन टॅपिंगवरून विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर कडाडून हल्ला चढवला आहे. संसदेत काँग्रेसने या मुद्यावर मोदी सरकारला धारेवर धरले आहे.
कथित हेरगिरीसाठी इस्त्रायली कंपनीला बक्कळ पैसा दिल्याचे बोलले जात आहे. मंगळवारी काँग्रेसने याबाबत केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला. काँग्रेसने म्हटले आहे की हेरगिरीचा खर्च भागवण्यासाठी सरकार केवळ पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवत आहे.
अधिक वाचा
काँग्रेस प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी मंगळवारी ट्विट केले की, "प्रिय देशवासियांनो, कृपया संभाषणासाठी फोन वापरू नका. कारण फोनची किंमत फक्त काही हजार असते पण सरकारला तुमच्या फोनची किंमत कोट्यवधी रुपये पडते.
तो खर्च भागवण्यासाठी, तर पेट्रोल आणि डिझेल महाग करावे लागते. यासह सुरजेवाला यांनी भाजपला 'भारतीय गुप्तचर पार्टी' हॅशटॅगचा वापर केला.
भारतासह जगातील अनेक देशांमध्ये इस्रायली पेगासस नावाच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून लोकांच्या व्हॉटसअॅपवर पाळत ठेवल्याची माहिती 2019 मध्ये उघड झाली.
व्हॉट्स अॅपनं यासंदर्भात एनएसओ (NSO) या कंपनीला कोर्टात खेचल्यानंचर संपूर्ण जगाच लक्ष याकडे वेधलं गेलं.
इस्रायलच्या NSO या इस्त्रायली सायबर इंटेलिजन्स कंपनीनं पेगासस सॉफ्टवेअरची निर्मिती केली आहे.
या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून व्हॉट्सअॅपची यंत्रणा भेदून पत्रकार, वकील आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांची हेरगिरी केल्याचं व्हॉट्सअपनं जाहीर केलं.
NSO या कंपनीनं मात्र त्यांच्यावरील हे आरोप फेटाळून लावले.
तिसर्या दिवशीही सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवल्या नाहीत. शनिवारी डिझेलच्या दरात कोणताही बदल झाला नाही तर पेट्रोलच्या किंमतीत 29 ते 30 पैशांची वाढ करण्यात आली.
मंगळवारी दिल्लीत पेट्रोलची किंमत 101.84 रुपये तर डिझेलची किंमत प्रति लिटर 89.87 रुपये आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत 107.83 रुपये तर डिझेलची किंमत प्रतिलिटर 97.45 रुपये आहे.
अधिक वाचा
कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत 102.08 रुपये तर डिझेलची किंमत 93.02 रुपये प्रतिलिटर आहे.
चेन्नईमध्ये पेट्रोल 100 च्या पार आहे. येथे पेट्रोल 102.49 रुपये प्रति लीटर आहे तर डिझेल 94.39 रुपये प्रति लीटर आहे.
हे ही वाचलं का?
पाहा PHOTOS : विठूरायाचे मंदिराला फुलांचा साज
[visual_portfolio id="10374"]