राष्ट्रीय

pegasus spyware: संसदेत जोरदार हंगामा; ‘खेला होबे’च्या घोषणा

backup backup

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन: पेगासस (pegasus spyware)आणि कोरोनावर चर्चा करण्यावर अडून बसलेल्या विरोधकांनी सलग आठव्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गोंधळ घातला. पेगासससह (pegasus spyware)अन्य विषयांवरून काँग्रेससह १४ विरोधी पक्षांनी सरकारला घेरण्याची तयारी केली आहे.

राहुल गांधी यांच्‍यासह अन्‍य नेत्यांनी बुधवारी पेगासस च्या मुद्द्यावरून लोकसभेत कार्यस्थगन प्रस्ताव दिला आहे.

अधिक वाचा:

जोरदार गोंधळामुळे लोकसभा आणि राज्यसभेची कार्यवाही २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.

लोकसभेत 'खेला होबे' च्या घोषणा दिल्या गेल्या. त्यामुळे प्रथम १२.३० आणि नंतर २ वाजेपर्यंत कामकाज स्थगित केले.

लोकसभेचे कामकाज प्रचंड गोंधळात सुरू झाले.

अधिक वाचा: 

या गोंधळातच भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांना आयटी कमिटीच्या अध्यक्षपदावरून हटविण्याची मागणी केली.

त्यांनी थरूर याच्यावर मनमानीचा आरोप लावला आहे. जोपर्यंत थरूर यांना हटविले जात नाही तोवर बैठकीत सहभागी होणार नाही असे दुबे म्हणाले.

लोकसभेत गोंधळ सुरू झाल्याने पहिल्यांदा १२.३० पर्यंत स्थगित केली होती.

त्यानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी पाने फाडून टाकत जोरदार घोषणा दिल्या. यादरम्यान खेला होबे च्या घोषणाही दिल्या.

अधिक वाचा:

राज्यसभेतही गोंधळ

१२ वाजता राज्यसभेचे कामकाज सुरू झाले ते विरोधी पक्षांच्या गोंधळात. यावेळी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नखवी यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली.

'काँग्रेस आपले घर सांभाळू शकत नाहीत. आज संसदेचे कामकाज चालावे ही विरोधकांतील बहुतांश लोकांची ईच्छा आहे.

वाद, चर्चा झाल्या पाहिजेत. पण काँग्रेस आपल्या नकारात्मक भूमिका विरोधकांवर थोपवत आहे.

अन्य पक्षांच्या सकारात्मक विचारांना बंदिस्त करू पाहत आहे. '

हेरगिरी प्रकरणात तडजोड नाही: राहुल गांधी

पेगासस हेरगिरी प्रकरणात राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार हल्ला केला आहे. पंतप्रधान आणि गृहमंत्री अमित शहा यांनी याप्रकरणी उत्तर द्यावे.

तर सरकारी पक्षाचे म्हणणे आहे की, विरोधक ना सभागृह चालू देत नाही आणि चर्चाही करत नाही.

विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर राहुल गांधी म्हणाले की, पेगासस हेरगिरी प्रकरणात कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही.

आम्ही १४ पक्षांनी मिळून नोटीस दिली आहे. विरोधी पक्ष वेगवेगळ्या मुद्द्यांवरून विखुरले असले तरी पेगासस हेरगिरी प्रकरणावरून ते सरकारला घेरत आहेत.

अधिक वाचा

विरोधी पक्षांची बैठक

दोन्ही सभागृहात जोरदार गोंधळ झाल्यानंतर सर्व विरोधी पक्षांची बैठक झाली. सरकारला पेगासस हेरगिरी प्रकरणावरून घेरण्याची तयारी केली आहे.

बैठकीत आम आदमी पक्ष, शिवसेना, आरजेडीसह अन्य पक्ष सहभागी झाले.

हेही वाचा : 

पहा व्हिडिओ: पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT