भारताने जम्मू-काश्मीरच्या मुद्यावर संयुक्त राष्ट्रच्या ( United Nations ) व्यासपीठावरुन पुन्हा एकदा पाकिस्तानला दणका दिला. 'तुम्ही येथे शांतता आणि सुरक्षा यावर भाषणबाजी करत आहात. तर तुमचे पंतप्रधान आंतरराष्ट्रीय दहशतवादी ओसामा बिन लादेन याला शहीद म्हणत त्याचा गौरव करत आहेत', अशा शब्दात भारताने पाकिस्तानला खडेबोल सुनावले.
मागील महिन्यातच भूमिकेवर भारताने संयुक्त राष्ट्रमध्ये ( United Nations) 'राइट टू रिल्पाय'च्या माध्यमातून पाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेवर भाष्य केले होते. तसेच केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीर, लडाख हे भारताचे अविभाज्य भाग आहेत,असेही ठणकावले होते.
भारताने पुन्हा एकदा 'राइट टू रिल्पाय'च्या माध्यमातून भारताचे प्रतिनिधी ए अमरनाथ म्हणाले की, पाकिस्तान या व्यासपीठावरुन शांतता आणि सुरक्षावर चर्चा करत आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे आंतरराष्ट्रीय दहशतवादी ओसामा बिन लादेन याला शहीद म्हणून संबोधित आहेत.
संयुक्त राष्ट्रांच्या नियमांची पायमल्ली करत जगाची दहशवादी केंद्र झालेला पाकिस्तान शेजारील देशांच्या सीमेवर दशतवादाला खतपाणी घालत आहे. तसेच केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीर, लडाख हे भारताचे अविभाज्य भाग आहेत,असेही ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर निराधार माहिती देणारा पाकिस्तान हा सामूहिक अवमानास पात्र आहे, असेही त्यांनी सुनावले.
मागील महिन्यात भारताच्या सचिव स्नेहा दुबे यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना सडेतोड उत्तर दिले होते. त्यांनी पाकिस्तानचा दुटप्पीपणाही सभागृहाला दाखवून दिला होता.